यशोगाथा : शेतीपयोगी इलेट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीतून एका इंजिनिअरची उद्योग भरारी

आर एन एन्टरप्राईजेसचे को फाउंडर निकेश मधूकर निब्रड यांचा आज वाढदिवस..... गेल्या 10 वर्षांत 10 हजारांपेक्षाही अधिक ग्राहकांचा, शेतक-यांचा विश्वास संपादीत...

बहुगुणी डेस्क, वणी: घरी यथातथाच परिस्थिती, मात्र शिक्षणाची ओढ असल्याने उच्च शिक्षण घेतले… अनेक चांगल्या नोकरीची संधी मिळाली… शासकीय नोकरी करण्याचीही संधी होती… मात्र हे सर्व न करता वेगळी वाट निवडून आज शहरात एक यशस्वी उद्योजक म्हणून आपली ओळख निर्माण करणारे युवा युद्योजक म्हणजे निकेश मधुकर निब्रड… परिसरात शेतीपयोगी लागणा-या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या सर्व प्रथम नाव घेतले जाते ते आर एन एन्टरप्राईजेसचे. या फर्मचे निकेश निब्रड हे को फाउंडर असून आज सोलर सिस्टम विक्रीत त्यांच्या फर्मने संपूर्ण परिसरात उच्चांक गाठला आहे. गेल्या 10 वर्षांत 10 हजारांपेक्षाही अधिक ग्राहकांचा, शेतक-यांचा विश्वास संपादीत त्यांनी केला आहे. आज त्यांचा वाढदिवस.. त्यांच्या वाढदिवसानिमित्त RN सोलर येथे झटका मशिनचिया खरेदीवर 5 किलो क्लच वायर अगदी मोफत दिला जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी या ऑफरचा त्वरित लाभ घ्यावा असे आवाहन RN सोलर तर्फे करण्यात आले आहे. 

निकेश मधुकर निब्रड यांचा 9 नोव्हेंबर रोजी मुळ गाव किन्ही बल्लारपूर ये जन्म झाला. त्यांचे वडिल हे चालक म्हणून काम करायचे. पुढे ते नोकरी निमित्ताने उकणी येथे स्थायिक झाले. निकेश यांनी 10 वी पर्यंतचं शिक्षण उकणी येथील नवभारत हायस्कूलमध्ये घेतलं. नंतर 11 वी व 12 वी त्यांनी वरोरा येथील आयकॉन इंटरनॅशनल येथे पूर्ण केलं. त्यानंतर वणीतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण येथे आयटीआय पूर्ण केलं. त्यानंतर सावर्ला येथे इलेट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पॉलिटेकनिक पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना खासगी नोकरीच्या अनेक संधी चालून आल्यात. शिवाय शासकीय नोकरीचा पर्याय देखील होता. मात्र त्यांनी त्यांची स्वतंत्र वाट निवडत व्यवसायात नशिब आजमावण्याचे निश्चित केले. त्यांनी 10 वर्षांआधी त्यांच्या मित्रासोबत आरएन एनटरप्राईजेस या पार्टनरशिप फर्मची स्थापना केली. वरोरा रोड, वणी (MCED च्या बाजूला) येथील नगर पालिकेच्या गाळ्यामध्ये आपले स्टोअर व कार्यालय सुरू केले. त्यांनी शेतक-यांसाठी लागणा-या विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीची सुरूवात केली.

वाजवी दर, उत्कृष्ट सर्विस, दर्जेदार प्रॉडक्ट यामुळे लवकरच त्यांनी परिसरातील शेतक-यांचा विश्वास संपादन केला. माउथ पब्लिसिटीने त्यांच्या प्रॉडक्टची मोफत प्रसिद्धी झाली. शेतीसाठी लागणारी झटका मशिन या प्रॉ़डक्टने विक्रीचा उच्चांक गाठला. सोबतच तूर कटर मशिन, टॉर्च, डॉग बार्किंग मशिन इत्यादी अनेक शेतीपयोगी वस्तू शेतकरी वापरत आहेत. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत अल्पावधीतच एक यशस्वी व्यावसायिक व उद्योजक म्हणून ओळख निर्माण करणारे निकेश मधुकर निब्रड यांचा आज वाढदिवस आहे.

सोलर झटका मशिनवर 10 टक्के सूट
निकेश निब्रड यांच्या वाढदिवसानिमित्त झटका मशिनवर 10 टक्के पर्यंतची सूट देण्यात येत आहे. ही सुट अवघे तीन दिवस आहे. त्यामुळे परिसरातील शेतक-यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. आरएन एन्टरप्राईजेसमध्ये 1 एकर ते 50 एकर पर्यंतची सोलर मशिन उपलब्ध आहेत.

50 व15 एकरसाठीच्या मशिनचे वैशिष्ट्ये
दोन्ही मशिन ही झटका मशिनमध्ये सुप्रसिद्ध असलेल्या Z + सुरक्षा या ब्रँडची आहे. 50 एकरच्या मशिनमध्ये 26 Ah 12 वोल्टची बॅटरी आहे. 40 वॅटची प्लेट यात आहे. तर 15 एकरसाठीच्या मशिनमध्ये 12 Ah 12 व्होल्टची बॅटरी आहे. तर 20 वॅटची सोलर प्लेट आहे. दोन्ही बॅटरीसोबत अर्थिंग तार, अर्थिंग प्लेट, कनेक्शन वायर, 100 इन्सुलेटर आहे. विशेष म्हणजे ही मशिन थेट उत्पादकांकडून कडून ग्राहकांना दिली जाते त्यामुळे अतिशय वाजवी दरात ग्राहकांना ही मशिन खरेदी करता येणार आहे.

आपला परिसर हा जंगलाच्या लगत असल्याने शेतकऱ्यांना रानडुकरे, नीलगाय, हरीण, सांबर यांचा कायमच अतिशय त्रास सहन करावा लागतो. वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे जवळपास 75 टक्के पिकांचे नुकसान होते. वन्यप्राण्याच्या त्रासापासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी वणीतील वरोरा रोडवरील R & N सोलर सिस्टिम ऍन्ड इलेक्ट्रॉनिक्समध्ये Z+ सुरक्षा कंपनीची कुंपणासाठी सोलर झटका बॅटरी मशिन उपलब्ध आहे. 

Comments are closed.