परतीच्या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान
पीक विम्याच्या मागणीसाठी तहसिलदारांना निवेदन
गिरीश कुबडे, वणी: वणी तालुक्यातील निळापूर, ब्राह्मणी या गावातील शेतकऱ्यांचे परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. कपाशीचे बोंडे बुरशी चढून सडून गेली. यात हाती आलेल्या पिकांचे कमीत कमी ७५ टक्के नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्याचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे पिकांच्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी व पीक विमा मिळण्यात यावा अशी मागणी निळापूर, ब्राह्मणीच्या शेतकऱ्यांकडून करण्यात आली
सात दिवसाच्या आत जर पिकाची पाहणी करून तपासणी करण्यात नाही आली, तर दोन्ही ग्रामवासी तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी लढा शेतकऱ्यांच्या हक्काचा या संघटनेचे अध्यक्ष राघवेंद्र कूचनकार, अनिल घाटे, दशरत बोबडे, देवराव धांडे, अनिल बोधले आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.