पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी येथील पत्रकार नीलेश अशोकराव चैधरी यांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल राष्ट्रनिर्माता पुरस्कार जाहीर झाला आहे. अमरावती येथे दिनांक 16 जून रोजी दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. शिक्षक सन्मान संघ महाराष्ट्र प्रणीत शिक्षक सन्मान अभियाना अंतर्गत हा पुरस्कार देण्यात आला आहे. राष्ट्रनिर्माता हा राज्यस्तरीय पुरस्कार आहे. महाराष्ट्रातील उत्कृष्ट शिक्षक, सामजिक कार्यकर्ते, प्रशासकीय सेवेतील अधिकारी, पत्रकार तसेच विविध क्षेत्रात कार्यरत 40 व्यक्तीं व संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. नीलेश चौधरी यांना पुरस्कार झाल्याने एका तळागाळातील लोकांच्या हक्कासाठी लढणा-या पत्रकाराचा उचित सन्मान झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल पत्रकारिता क्षेत्र व शहरातील गणमान्य व्यक्तींकडून अभिनंदन केले जात आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.