ग्राउंडवर फिरायला जाणे पडले महागात, दुचाकी चोरी

शहरात दुचाकी चोरीच्या घटना सुरुच...

विवेक तोटेवार, वणी: शहरात दुचाकी चोरीच्या घटना काही केल्या थांबेना. रविवार दिनांक 9 जून रोजी शासकीय मैदान येथे फिरावयास आलेल्या एका व्यक्तीची दुचाकी चोरट्यानी चोरून नेली. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रविणकुमार राधाकृष्ण कंडे (37) रा. मारोती टाऊनशीप चिखलगाव येथील रहिवासी आहे. ते रोज पाण्याच्या टाकीजवळील शासकीय मैदान येथे फिरायला जातात. रविवारी रात्री 8 वाजता ते त्यांची हिरो होन्डा डिलक्स या दुचाकीने (MH 29 DL 6939) शासकीय मैदानावर गेले. तिथे त्यांनी गेटजवळ दुचाकी उभी केली व ते मैदानात फिरायला गेले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

काही वेळाने ते परत आल्यावर त्यांना दुचाकी आढळून आली नाही. आजूबाजूला शोध घेतला असता त्यांना दुचाकी दिसून आली नाही. शेवटी आज सोमरवारी दिनांक 10 जून रोजी  त्यांनी वणी पोलिसात याबाबत तक्रार दिली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Comments are closed.