वेकोलि ओबीसी कोल एम्पलॉईज वेलफेअरची कार्यकारिणी घोषीत

अध्यक्षपदी संकेत खोकले तर सचिव पदी गणेश रोडे यांची निवड

बहुगुणी डेस्क, वणी: वेकोलि वणी क्षेत्राच्या बॅकवर्ड क्लास (ओबीसी) कोल एम्पलॉइज वेल्फेअर असोसिएशनची कार्यकारणी घोषित करण्यात आली. यात अध्यक्षपदी संकेत खोकले तर सचिव पदी गणेश रोडे यांची निवड करण्यात आली. वेकोलि महासचिव राकेश कडू यांच्या अध्यक्षतेत नुकतीच क्षेत्रीय कार्यालयात याबाबत बैठक पार पडली. यात सर्वानुमते सदर असोसिएशनच्या कार्यकारिणी गठित करण्यात आली.

उपाध्यक्ष म्हणून रोशन जोगी, नगाजी झाडे, सचिव गणेश रोडे, सहसचिव जीवन मते, कोषाध्यक्ष राजीव कुंडले, मीडिया प्रभारी सुनील बिपटे तर सदस्य म्हणून शरद ठाकरे, अजय मिलमिले, दीपक झाडे, योगेश कोल्हेकर, आनंद येसेकर, अक्षय कैरासे, निलेश पिंपळकर, मंगेश भोयर, आदींचा समावेश आहे. यावेळी नवीन कार्यकारिणी वेकोलि कामगारांच्या कल्याणासाठी कायम तत्पर राहणार असे वचन नवनियुक्त कार्यकारिणीने दिले.

यावेळी वेकोलि मुख्यालयाचे अध्यक्ष चेतन सेलोकर, नागपूर क्षेत्र अध्यक्ष जितेंद्र, घुगुस सबएरिया अध्यक्ष घनश्याम कुटेमाटे, नायगाव कार्यकारी अध्यक्ष प्रशांत डोये, मुख्यालय वणी क्षेत्र कचरू तपासे, निलजई सबएरिया अध्यक्ष प्रवीण झाडे, नितीन बदखल, राजकुमार सावे, अनुप हेपट, धीरज दोडके आदी मान्यवरांची उपस्थिती होती. मान्यवरांनी नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.

Comments are closed.