बहुगुणी डेस्क, वणी: शहरात बाईक चोरींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. कुठून कुणाची बाईक गायब होईल हे सांगायला मार्ग नाही. मंगलम पार्कच्या आर. के. अपारमेंटमध्ये खाजगी नोकरी करणारे फिर्यादी शकील जमील शेख (52) राहतात. रविवार दिनांक 02 जून रोजी सकाळी 10.00 वा ते दुपारी अंदाजे 02.00 वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी अज्ञात चोरट्याने लंपास केली. त्यांना काम पडल्यावर ते गाडीपाशी आलेत. मात्र त्यांना आपली गाडी जागेवर दिसली नाही.
त्यांनी बराच वेळ इतरत्र आपल्या गाडीचा शोध घेतला. परिसरातल्या लोकांना विचारपूस केली. मात्र हाती काहीच आलं नाही. आपली गाडी चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मग अखेर बुधवार दिनांक 05 जूनला त्यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
शकील जमील शेख यांची होन्डा शाईन कंपनीची लाल व काळ्या रंगाची (MH 29 CE 4217) अंदाजे 70 हजार रूपये किमतीची ती मोटार सायकल होती. ती दिवसाढवळ्या चोरट्याने पळविली. त्यांच्या तक्रारीनुसार अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 303 (2) BNS अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास हे.कॉ. बारसागरे करत आहेत.
Comments are closed.