वृद्धाला तरुणाची जबर मारहाण, विरकुंड येथील घटना

आरोपीविरोधात गुन्हा दाखल

0

विवेक तोटेवार, वणी: एका वृद्धाला जबर मारहाण केल्या प्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना तालुक्यातील विरकुंड येथे शनिवारी दिनांक 24 जुलै रोजी घडली. या प्रकरणी आज तक्रार दाखल करण्यात आली आहे.

विरकुंड येथे कवडू काशिनाथ मोतेकर (66) हे राहतात. शनिवारी दिनांक 24 जुलै रोजी संध्याकाळी 5 ते 6 वाजताच्या सुमारास ते गावातील बस स्टॉपकडे जात होते. दरम्यान गावातच राहणारा तरुण सतीश अशोक थेरे (22) याने त्यांचा पाठलाग केला व बस स्टॉप जवळ मागून येऊन त्यांना लाथ मारून खाली पाडले.

मोतेकर खाली पडल्यावर आरोपी सतीश हा त्यांच्या अंगावर बसला व त्यांना लाथा बुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याने जवळचा दगड उचलून मोतेकर यांना मारहाण केली. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत ते जखमी झाले व त्यांच्या डोळ्याखाली मार लागला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

जखमी झाल्याने ते उपचारासाठी चंद्रपूर येथे गेले. त्यांच्यावर चार दिवस तिथे उपचार चालला. त्यानंतर त्यांना आज मंगळवारी दिनांक 28 जुलै रोजी रुग्णालयातून सुटी मिळाली. सुटी मिळाल्यावर त्यांनी थेट वणी पोलीस स्टेशन गाठत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी आरोपी सतीश अशोक थेरे (22) याच्या विरोधात भादंविच्या कलम 324, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास बिट जमादार अनंता इरपाते करीत आहे.

हे देखील वाचा:

बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या शेतक-याचा सर्पदंशाने मृत्यू

 

Leave A Reply

Your email address will not be published.