अवैधरित्या विदेशी दारुची वाहतूक करताना एकाला अटक

16 हजारांची दारू जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: दुचाकीवर अवैधरित्या विदेशी दारुची वाहतूक करताना एका इसमाला डीबी पथकाने अटक केली आहे. बाबू विश्वनाथ गोलपेल्लीवार असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अटक इसमाकडून विविध कंपन्यांची 16,315 रुपयांची विदेशी बनावटीची दारु जप्त करण्यात आली आहे.

डीबी पथक प्रमुख सपोनि आनंद पिंगळे याना एक व्यक्ती गांधीचौककडून दुचाकीवर अवैधरित्या दारु वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली होती. माहितीवरून डीबी पथक कर्मचाऱ्यांनी सोमवार 27 सप्टें. रोजी दुपारी 11.30 वाजता दरम्यान भगतसिंग चौकात दुचाकी क्रमांक (MH29BA2799) थांबवुन झडती घेतली असता एका कापडी पिशवीत विविध कंपन्यांची विदेशी दारूच्या बॉटली आढळून आली.

पोलिसांनी दुचाकी चालक बाबू विश्वनाथ गोलपेल्लीवार (36) रा. दीपक टॉकीज चौपाटी यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. यावरून पोलिसांनी 16315 रुपयांची दारु व दुचाकी किंमत 40 हजार असे एकूण 56315 रुपयांचे मुद्देमाल जप्त केले. आरोपीविरुद्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (अ) (ई) अनव्ये गुन्हा दाखल केले आहे. पुढील तपास नापोका हरींदर भारती करीत आहे.

हे देखील वाचा:

बोटोणी परिसरात मुसळधार पाऊस, पिकांचे प्रचंड नुकसान

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.