बँकेच्या स्थानांतरणाविरोधात राजूरवासीयांचे एक दिवशीय उपोषण

शाखा व्यवस्थापकाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

पुरुषोत्तम नवघरे, वणी: राजूर येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेचे स्थानांतर होणार असल्याच्या चर्चेने सध्या राजूरवासीयांमध्ये नाराजी पसरली आहे. शाखेचे स्थानांतरण करू नये यासाठी गावातील महिलांनी व खातेदारांनी एक दिवशीय लाक्षणिय उपोषण केले. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात राजूर व परिसरातील खातेदार सहभागी झाले होते. अखेर शाखा व्यवस्थापकाने आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.

राजूर येथे मोठ्या प्रमाणात छोटे-मोठे उद्योग आहे. परिसरात असलेल्या चुनाभट्टी व कोळशाच्या खाणीमुळे इथे मोठ्या प्रमाणात मजूर व कर्मचारी वर्ग आहे. हा वर्ग महाराष्ट्र बँकेचे खातेदार आहेत. शिवाय शेतकरी, शेतमजूर व बचत गटाच्या महिलांचेही याच बँकेत खाते आहे. मात्र लवकरच ही शाखेचे चिखलगाव येथे स्थानांतरण होत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राजूर वासीयांमध्ये नाराजी पसरली आहे.

जर शाखेचे स्थानांतरण झाले तर याचा शेतकरी, शेतमजूर, चुनाभट्टी मजूर, बचत गटाच्या महिला इत्यादींना फटका बसून बँकेच्या काम त्यांना गैरसोयीचे होऊ शकते. त्यामुळे गावातील महिलांनी व खातेदारांमध्ये नाराजी पसरली असून त्यांनी याविरोधात आंदोलन पुकारत सोमवारी शाखेसमोरच एक दिवशीय उपोषण केले.

उपोषणस्थळी लोकप्रतिनिधी व विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिका-यांनी भेट देत खातेदारांच्या मागणीला पाठिंबा दिला. अखेर शाखा व्यवस्थापकाने आंदोलकांशी संवाद साधत याबाबत आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी उपोषण मागे घेतले. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला व खातेदारांची उपस्थिती होती.

हे देखील वाचा:

धक्कादायक…! दिवसाढवळ्या कुमारीकेला फरपटत नेऊन अत्याचार

मुकुटबन येथील आरोग्य शिबिरात 50 पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी

 

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.