जब्बार चीनी, वणी: समता सैनिक दलातर्फे आज रविवारी दिनांक 14 फेब्रुवारी रोजी एकदिवशीय प्रशिक्षण शिबिर होणार आहे. सदर शिबिराला डॉ.बाबासाहेब आंबेडकर. न. प. शाळा क्रमांक 3 शाळेत सकाळी 9 वाजता सुरूवात होणार आहे. या शिबिरात वणी, मारेगाव आणि झरी या तिन्ही तालुक्यातील बौद्ध अनुयायी व भीम सैनिक उपस्थित राहणार आहे. दरम्यान शिबिरात ‘एक घर, एक सैनिक’ या अभियानाला देखील सुरूवात केली जाणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण वनकर (अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका.) राहणार आहे. तर प्रमुख अतिथी भगवान इंगळे (भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष यवतमाळ.), विद्यानंद पाटील (भारतीय बौद्ध महासभा उपाध्यक्ष संरक्षण विभाग.), सुचिता पाटील (भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष वणी शहर.), रमेश तेलंग (भारतीय बौद्ध महासभा सरचिटणीस वणी.), रज्जत सातपुते (भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, संरक्षण विभाग वणी, मारेगाव, झरी.) हे राहणार आहेत.
परेड संचालन गौतम जिवने यांच्या मार्गदर्शनात घेतले जाणार आहे. तर शिबिराचे सूत्रसंचालन काजल भगत करणार आहे. मान्यवरांतर्फे ‘एक घर, एक सैनिक’ या अभियानासंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील केंद्रीय शिक्षक, केंद्रीय शिक्षिका, उपासक व उपासिका बौद्ध अनुयायी, तसेच सर्व भीमसैनिकानी उपस्थित राहावे असे आवाहन समता सैनिक दलातर्फे करण्यात आले आहे. समता सैनिक दलाची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली असून ही संघटना सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे.
हे देखील वाचा:
वणी शहरात छुप्या मार्गाने फोफावतोय देहविक्री व्यवसाय (भाग – 1)
जामनी गावाला झरी नगर पंचायत क्षेत्रातून वगळल्या प्रकरणी कोर्टाची फटकार