एकतर्फी प्रेमातून युवतीवर जीवघेणा हल्ला

0
वणी/विवेक तोटेवार: वणी तालुक्यातील गोडगाव येथे एका युवकाने एकतर्फी प्रेमातून एका युवतीवर जीवघेणा हल्ला केला. मंगळवारी दुपारी 3.30 वाजताचा दरम्यान ही घटना घडली. युवतीचे प्रकृती गंभीर असून तिच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली  आहे.

 

Podar School 2025
स्वाती (नाव बदललेले) ही गोदगाव येथे राहते. ती 11 विची विद्यार्थिनी आहे. आरोपी निलेश दोरखंडे (२२) हा देखील गोडगावमध्येच राहतो. स्वातीच्या घराजवळच तिच्या वडिलांचा पान टपरीचा व्यवसाय आहे. निलेशचे पान टपरीवर येणे जाणे सुरू असायचे. अशातच त्याची नजर स्वातीवर गेली. तिच्यासोबत बोलण्याच्या उद्देशाने तो पाणी पिण्याचा बहाणा करून घरी जायचा.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मंगळवारी दुपारी निलेश नेहमीसारखा पाणी पिण्याच्या बहाण्याने स्वातीच्या घरी गेला. त्याने घरी  पिण्यासाठी पाणी मागितले व बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र निलेशची वाईट नजर स्वातीने आधीच ओळखली होती. त्यामुळे तिने त्याला प्रतिसाद देणे टाळले. तिने लगेच त्याची लगट धुडकावून लावली. स्वातीने धुडकवल्यामुळे निलेश संतापला व त्याने सरळ तिच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार केला.
वार केल्यानंतर निलेश घटनास्थळीवरून पसार झाला. या घटनेची माहिती परिसरातील एका लहान मुलाने तिच्या वडिलांना दिली. वडील लगेच घरी गेले असता त्यांना स्वाती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली.त्यांनी लगेच तिला उपचारासाठी वणीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र स्वतीची परिस्थिती गंभीर असल्याने तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. सध्या स्वातीवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून तिचा जीव आता धोक्याबाहेर आहे.
पोलिसांनी आरोपी निलेश याला अटक केली असून त्याच्यावर भा द वि कलम 307 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे करीत आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.