विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण व बौद्धीक गेमची सुविधा
जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचा अभिनव उपक्रम
सुशील ओझा, झरी: आदिवासी बहुल तालुक्यात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी व त्यांच्या शिक्षणाचा विचार करून मुकूटबन येथील एका ध्येयवेड्या शिक्षकाने वर्ग 1 ते 8 च्या विद्यार्थांकरीता ऑनलाईन अभ्यास व गेमची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सेवा व्हॉट्स ऍपच्या गृपमधून मिळत आहे.
देशभर कोरोनामुळ आपत्ती आल्याने सध्या लॉकडाउन आहे. शाळा सुध्दा बंद आहे. शाळा पुर्वरत कधी सुरू होइल हे नक्की सांगता येत नाही. त्यामुळे आपल्या शाळेतील विद्यार्थीचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता मुकूटबन जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षक जगदिश आरमुरवार यांनी ऑनलाईन अभ्सासक्रम व बौद्धिक गेमचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याकरिता वॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला आहे.
काय आहे व्हॉट्स ऍपगृपमध्ये?
या ग्रुप मध्ये तालुक्यातील सर्व पालकांना भाग घेता येते. पालकांनी ग्रुप मध्ये जॉईvऊन आपल्या मुलांना शिक्षण घेत येते. या गृपमध्ये शैक्षणिक video, प्रश्नोत्तरांची लिंक सेंड केली जाते. या लिंकवर विविध ट्युटोरिअल तसेच प्रश्नमंजुशा आहे. पालकांनी ही लिंक ओपन करून त्यांच्या पाल्यांना द्यायची आहे. त्याद्वारे शिक्षण आणि बौद्धिक दोन्हीचा विकास होण्यास मदत होणार आहे.
https://chat.whatsapp.com/EACYoEhxIC6BvxvbVkbhEc या व्हॉट्स ऍप लिंक वरून तालुक्यातील प्रत्येक पालक व विद्यार्थी ऍड होता येणार आहे. जि.प शाळा मुकूटबन येथील वर्ग १ ते ८ पर्यंत विध्यार्थ्यांचे व्हाट्सउप ग्रुप तयार करून दररोज ऑनलाइन किव्ज (लिंक) तयार करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले जात आहे. त्या लिंक वरून विद्यार्थी अभ्यास करू लागले आहे.
शाळा बंद असली तरी शैक्षणिक कार्य सुरू असणे गरजेचे आहे. मुलांना ऑनलाईन शिकवणी आणि त्यासोबतच गेमद्वारे शिक्षण मिळत असल्याने मुलही आनंदाने हे शिकत आहेत. ही शिकवणी घरीच मिळत असल्याने विद्यार्थ्यांनाही कोरोना संसर्ग पासून दूर राहता येईल व शिक्षणही पूर्ण होणार आहे. या द्वारे मुलांमध्ये शैक्षणिक गोडी निर्माण व्हावी हा हेतू आहे.
– जगदीश आरमुरवार, शिक्षक
रंजक शिक्षणासाठी KAHOOT!.IT चा वापर
KAHOOT!.IT हे एक शैक्षणिक गेमिंग प्लॅटफॉर्म आहे. या ऍपमध्ये गेम तयार करून मुलांना त्यांच्या घरी त्यांच्या वेळेनुसार खेळता येते. यात असलेल्या प्रश्नमंजुषा मध्ये चित्र, व्हिडीओ असल्यामुळे विद्यार्थ्यांना ते आवडीचे वाटतात आणि हसत खेळत त्यांच्याकडून अभ्यास घर बसल्या करून घेता येतो. या गेम मध्ये ग्रुप वर लिंक दिली जाते आणि एक पिन नंबर दिला जातो. लिंक ओपन करून पिन नंबर टाकले की गेम स्टार्ट होतो. प्रत्येक प्रश्न साठी वेळ (60 सेकंद) दिला जातो.
जितक्या लवकर उत्तर दयाल तितके पॉईंट वाढते. चुकीने आपला प्रश्न चुकला तर गेम न सोडता next बटनावर क्लिक करून पुढचे प्रश्न सोडवावे लागते. शेवटी जास्तीत जास्त point मिळविणारा विद्यार्थी विजय होतो. झरी सारख्या आदिवासी बहुल भागात अत्याधुनिक टेक्नॉलॉजिच्या साहाय्याने मनोरंजनाच्या माध्यमातून मुलांना शैक्षणिक धडे देणारे शिक्षक जगदिश आरमुरवार यांच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.