वणीत एका व्यापा-याची ऑनलाईन फसवणूक

KYC अपडेट करण्याच्या नावाखाली गंडा घालण्याचा प्रयत्न

0

जब्बार चीनी, वणी: नोटबंदीनंतर ऑनलाईन स्वरूपातील आर्थिक व्यवहारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. परिणामी सायबर क्राईमही चांगलाच वाढलेला आहे. केवायसी, एटीएम कार्ड बंद झाले, ऍप रिन्युअल करा, लॉटरी लागली असे अनेक कारण सांगून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. अलिकडे लोक कॅशलेस व फंड ट्रान्सफर करण्यासाठी फोन पे, पेटीएम, गुगल पे सारख्या ऍपचा वापर करतात. अलिकडेच या ऍपमध्ये केवायसी अपडेट करण्याचे कारण देऊन एकाची फसवणूक करण्यात आली. मात्र वेळीच संशय आल्याने फसवणूक जरी झाली असली तर 10 हजारांचे चंदन लागण्यापासून ती व्यक्ती थोडक्यात बचावली.

बँकेत जाऊन ट्रान्सफर करण्यापेक्षा अलिकडे ग्राहक पैसे ट्रान्सफर करण्यासाठी पेटीएम, गुगल पे, फोन पे इत्यादी ऍपचा वापर करतात. यात अकाउंट नंबर ऐवजी मोबाईल नंबरद्वारा पैसे एका क्षणात ट्रान्सफर करता येत असल्याने याकडे ग्राहकांचा कल अधिक आहे. या ऍपला मोबाईल नंबर व अकाउंट नंबर जोडले की सर्व व्यवहार करता येतात.

वणी येथील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे व्यापारी सचीन बोढे यांना एक निनावी कॉल आला. आम्ही पेटीएम कस्टमरच्या सर्व्हींसमधून बोलत आहो. आपले पेटीएम अकाउंट केवायसी नसल्याने बंद होऊ शकते. तरी आपण काही सूचना पाळून हे अकाउंट सुरू ठेवा असे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांच्या अकाउंटवर एक चार आकडी क्रमांक आला असून तो सांगण्याची समोरच्या व्यक्तींनी विनंती केली.

सचिन यांनी मोबाईलवर मॅसेज चेक केला असता त्यांना बँकेद्वारा त्यांच्या अकाउंटवरून 10 हजारांची खरेदी केल्याचे निदर्शनास आले व ते पैसे भरण्यासाठी ओटीपी टाकण्याची विनंती केली गेली होती. ओटीपी कुणालाही शेअर करू नका असे वारंवार बँकेतर्फे सांगण्यात येते. त्यामुळे त्यांना हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात आले. त्यांनी त्वरित पेटीएम ब्लॉक केले व बँकेत चौकशी केली. तेव्हा त्यांच्या अकाउंटमधून 10 हजारांची खरेदी केल्याचे समोर आले. मात्र ओटीपी न टाकल्याने ते ट्रॅन्झॅक्शन कॅन्सल झाल्याचे कळले. त्यामुळे त्यांचे 10 हजार रुपये वाचले.

ओटीपी कुणालाही सांगू नका….
बँकेद्वारा वेळोवेळी आपला ओटीपी कुणालाही सांगू नका तसेच एटीएम बाबतची माहिती कुणालाही फोनवर देऊ नका असे सांगण्यात येते. तसेच बँक कोणत्याही ग्राहकांना माहिती विचारण्यााठी कॉल करत नाही असेही बँकेने वेळोवेळी स्पष्ट केले आहे. मात्र तरीही एटीएम कार्ड एस्पायरी झाले, ऍप ब्लॉक झाले असे कारणे देऊन फसवणूक केली जाते. तरी कुणीही एटीएमची माहिती व ओटीपी मागत असेल तर तो कॉल फ्रॉड समजून अशी माहिती कुणालाही सांगू नये अशी सूचना केली आहे.

कशी घ्यावी खबरदारी ?
या सारख्या एसएमएसपासून राहा सावध
– Your Paytm KYC has expired (तुमची पेटीएम KYC संपली आहे)
– Or it needs to be renewed (याला नुतनीकरण करण्याची गरज आहे)
– Or your account will be blocked in 24 hours (तुमचे अकाउंट २४ तासांत ब्लॉक करण्यात येईल.

असा होतो फ्रॉड…
तुम्हाला एसएमएस किंवा फोन करून केवायसी किंवा अन्य कारण सांगून वैयक्तिक माहिती विचारली जाते. अनेकवेळा युजर्संकडून Anydesk या सारखा कोणताही अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. Anydesk, TeamViewer, किंवा QuickSupport यासारखे अॅप इन्स्टॉल केल्यानंतर एक ९ डिजिट कोड जनरेट केले जाते. युजर्सला या कोड मागितले जाते. कोड मिळाल्यानंतर हॅकर्स तुमच्या फोनचा अॅक्सेस मिळतो. आता तुमच्या फोनची स्क्रीन सहज ट्रॅक केले जाते. यावरून पेटीएम आणि मोबाइल बँकिंग अॅप अॅक्सेस घेतात व तुमचे अकाउंट रिकामे करू शकतात.

एक अन्य प्रकार म्हणजेच पेटीएम सारखी दिसणारी फेक वेबसाईट बनवून तुमचे पासवर्ड आणि ओटीपी जाणून घेतात. हॅकर्स wwww.paytmuser.com, wwww.kycpaytm.in अशा वेबसाईट बनवतात. ही दिसायला अधिकृत वेबसाइट दिसते. परंतु, ती खोटी असते. युजर्स या वेबसाइटवर क्लिक केल्यानंतर आपली माहिती नमूद करताच ही माहिती हॅकर्सला मिळते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.