वणी येथे ध्यान महोत्सवाचे आयोजन

रविवारी दुपारी 2 ते 4 वा. होणार शिबिर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तेज ज्ञान फाउंडेशनच्या रोप्य महोत्सवानिमित्त वणी येथे ध्यान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वणी येथील एसबी हॉलमध्ये रविवार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 2 ते 4 वाजताच्या दरम्यान हे शिबिर होणार आहे. 14 वर्षांवरील व्यक्तींना या शिबिरात सहभागी होता येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आर्णी येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामहित संस्थेचे संस्थापक पंकज महल्ले, ग्रामहीतच्या सहसंस्थापिका तसेच जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकाच्या मुखपृष्ठावरील मानकरी श्वेता ठाकरे महल्ले व वणी येथील कथावाचक मनू महाराज तुगनायत यांच्या उपस्थिती राहणार आहे.

Podar School 2025

तेज ज्ञान फाउंडेशन ही ‘हॅप्पी थॉटस्” च्या नावाने ओळखली जाणारी एक सुपरिचित संस्था आहे. 1999 पासून सर्वोच्च विकसीत समाजाच्या निर्मितीसाठी ही संस्था काम करते. महाआसमानी परमज्ञान शिबिर हा या संस्थेचा प्रमुख कार्यक्रम आहे. फाउंडेशनचे सर्व कार्यक्रम आयएसओ नामांकनाने प्रमाणित आहेत. हा कार्यक्रम पूर्णपणे मोफत असून सर्व वणीकर जनतेने या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा असे आयोजन समितीच्या वतीने आवाहन केले आहे. 

Comments are closed.