सुशील ओझा, झरी: तालुक्यातील खातेरा ग्रामपंचायत व मुकुटबन आरोग्य केंद्र यांच्या सहकार्याने कोविड 19 आरटीसीआर (RT-PCR) टेस्टिंग कॅम्पचे आयोजन ग्रामपंचायत मध्ये करण्यात आले. खातेरा गावामध्ये आधी दोन कोरोना पॉझिटीव्ह आढळले. परंतु आता रुग्णाची संख्या वाढून 14 वर गेली. तसेच एका तरुणाचा कोरोना सदृश्य आजाराने मृत्यू झाल्यामुळे गावात दहशत निर्माण झाली.
सध्या संपूर्ण गावात मोठ्या प्रमाणात तापाची साथ सुरू असल्यामुळे गावात दुस-यांदा कोरोना टेस्ट कॅम्प घेण्याचे ठरवण्यात आले व खातेरा येथे कॅम्पचे आयोजन करण्यात आले. कॅम्प मध्ये 90 आरटीपीसीआर (RT-PCR ) टेस्ट व 18 रॅपिड ऐनटीझन टेस्ट अशा एकूण 118 लोकांची टेस्ट करण्यात आली.
कॅम्पच्या यशस्वीतेसाठी सरपंच विशाल ठाकरे, उपसरपंच योगेश मडावी, पुरुषोत्तम वानखडे, प्रा. देविदास गायकवाड, सचिन टाले, पोलीस पाटील राहुल गोडे, मनोहर ताजने, ग्रामसेवक कैलास जाधव, पटवारी शेंडे, रविंद्र गोडे, आशा वर्कर संगीता कुळसंगे, नीलेश उईके, गजानन डायकी व गावकर्यांनी सहकार्य केले.