प्री मान्सून मेंटनन्समुळे नियोजित वेळी शहरातील लाईन राहणार बंद

नागरीकांनी सहकार्य करावे,विद्युत विभागाचे आवाहन

0

नागेश रायपुरे, मारेगाव: प्री मान्सून मेंटनन्समुळे मारेगाव शहरातील वीज ही 22 ते 28 में पर्यंत ठरलेल्या परिसरात नियोजित वेळी बंद राहणार आहे. वीज गेल्यास शहरातील नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मारेगाव विद्युत महावितरण विभागाचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता गजेंद्र कुरलेवार यांनी केले आहे.

नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिने प्री मान्सून मेंटनन्समध्ये मारेगाव शहरातील विद्युत पोल जवळील झाडाच्या फांद्या तोडणे, लूज वायर टाईट करणे, तारांवर आलेल्या झाडाच्या फांद्या तोडणे आदी कामे केल्या जात आहे.

याकरीता शहरातील लाईन 22 में ते 28 में या कालावधीत नियोजित आराखड्या नुसार शहरातील ठरवलेल्या परिसरात,नियोजित दिवशी,ठरवलेल्या वेळी शहरातील लाईन बंद राहणार आहे.

या करिता शहरातील नागरिकांनी प्री मान्सून मेंटनन्सच्या कामाकरिता आपल्या परिसरातील लाईन गेल्यास विद्युत महावितरण प्रशासनास सहकार्य असे आवाहन मारेगाव विद्युत महावितरण विभागाचे प्रभारी उपकार्यकरी अभियंता गजेंद्र कुरलेवार यांनी शहरातील समस्त जनतेस केले आहे.

हेदेखील वाचा

अवैधरित्या दुचाकीने दारूची तस्करी करणारा अटकेत

हेदेखील वाचा

आज 54 पॉझिटिव्ह तर 39 रुग्णांनी केली कोरोनावर मात

हेदेखील वाचा

खातेरा येथे आरटीपीसीआर टेस्ट कॅम्पचे आयोजन

 

Leave A Reply

Your email address will not be published.