गव्हावर रोग आल्याने शेतक-याने पिकांत सोडले जनावरे

गव्हावर मरी आणि तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव

सुरेश पाचबाई, बोटोणी: बोटोणीजवळील बुरांडा (खडकी) येथील एका शेतक-याच्या शेतात गव्हावर आलेल्या विविध रोगांमुळे शेतक-यांने आपल्या पिकांमध्ये जनावरे सोडली. वारंवार फवारणी करूनही आणि योग्य ती काळजी घेऊनही पिक नष्ट होत असल्याचे दिसून आल्याने हतबल होऊन त्यांनी हे पाऊल उचलले.

सविस्तर वृत्त असे की बुरांडा (खडकी) शिवारात गजानन सदाशिव तिखट यांचे शेत आहे. त्यांच्याकडे 3 एकर शेती आहे. खरीप मध्ये त्यांनी शेतात सोयाबिन लावले होते तर आता रबी पिकांमध्ये ऑक्टोबर महिन्यात त्यांनी एक एकरात गव्हाची पेरणी केली होती. सध्या पीक दीड फुटांचे झाले आहे. मात्र गव्हावर मरी व तांबेरा रोग आला. त्यामुळे पाणांवर लहान ठिपके पडले आहे. मर रोगांमुळे पिकांवर भुरशी लागली आहे.

गव्हावर रोग येऊ नये म्हणून त्यांनी योग्य ती उपाययोजनाही केली. वेळो वेळी फवारणीही केली. पिकांची योग्य ती काळ घेतल्यावरही गव्हावर रोग आल्याने गजानन हे हतबल झाले व त्यांनी गव्हामध्ये जनावरे सोडले. पिकांवर आलेल्या रोगांमुळे शेतक-यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे याकडे शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. परिसरात तुरीवरही मोठ्या प्रमाणात रोग आला आहे.

बीज प्रक्रिया करूनच लागवड करा – एस के निकाळजे
हवामान बदल किंवा अवेळी आलेल्या पावसामुळे गव्हावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकते. तर काही वाणाची रोग प्रतिकारशक्ती कमी असते त्यामुळेही तांबेरा सारखा रोग पिकांवर येऊ शकतो. त्यामुळे शेतक-यांनी रोग प्रतिरोधक बियाण्यांची लागवड केल्यास यापासून बचाव करत येऊ शकतो. शिवाय योग्य वेळी पेरणी होणे ही गरजेचे आहे.
– एस के निकाळजे, कृषी अधिकारी मारेगाव

हे देखील वाचा:

कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला 50 हजारांची मदत

वणी बसस्थानकातून धावलेल्या बसवर करंजीजवळ दगडफेक

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.