मिलन लुथरियांचा बहुचर्चीत तडप सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला…

सुजाता टॉकीज मध्ये होतोय ऑल इंडिया रिलिज, कच्चे धागे, डर्टी पिक्चर, वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई, टॅक्सी नं 9211 इत्यादी सुपर डुपर हीट सिनेमे दिग्दर्शित करणा-या मिलन लुथरिया यांचा तडप हा सिनेमा आज रिलिज होतोय.

बहुगुणी डेस्क: कच्चे धागे, डर्टी पिक्चर, वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई, टॅक्सी नं 9211 इत्यादी सुपर डुपर हीट सिनेमे दिग्दर्शित करणा-या मिलन लुथरिया यांचा तडप हा सिनेमा आज रिलिज होतोय. वणी आपल्याला हा सिनेमा सुजाता टॉकीजमध्ये लक्झरीयस वातावरणात बघता येणार आहे. विशेष म्हणजे सुनील शेट्टी यांचा मुलगा अहान शेट्टी या सिनेमाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करतोय. या सिनेमाच्या प्रिमिअर शोचे रिव्ह्यू सध्या मीडियातून आले असून या सिनेमाची समिक्षकांची चांगलीच तारीफ केली आहे. शिवाय अहान शेट्टी याच्या अभिनयाचे देखील चांगलेच कौतुक या निमित्ताने होत आहे. तडप हा तेलगु भाषेतील सुपरहीट मुव्ही आरएक्स 100 या सिनेमाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे.

तडप हा सिनेमा एक बिग बजेट सिनेमा असून साजिद नाडियाडवाला यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. तर सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शक मिलन लुथरिया यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. तर कथा रजत अरोडा यांची आहे. चित्रपटात अहान शेट्टी, तारा सुतारिया, सौरभ शुक्ला, कुमुद मिश्रा, सुमित गुलाटी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर सिनेमाला प्रितम यांनी संगीत दिले असून इरशाद कामिल यांनी गीत लिहिले आहे. चित्रपटातील गाणे आधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. मिलन लुथरियाच्या सिनेमाचे फॅन्स आवर्जून वाट बघत असतात. बादशाहो नंतर तब्बल 4 वर्षांनंतर मिलन लुथरिया हे तडप सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

कशी कराल बुकिंग?
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते (येथे क्लिक करा). व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएम बुकिंगची लिंक – https://paytm.com/movies/wani/tadap-movie-ticket-booking-04q8mdliq

Comments are closed.