मुकुटबन येथील कोळसा खाणीतून ओव्हरलोड वाहतूक
ओव्हरलोडिंगमुळे रस्त्याची दुर्दशा, प्रशासनाचे दर्लक्ष
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन, अडेगाव, गणेशपूर व मार्की-पांढरकवडा (ल) परिसरात डोलोमाईट, कोळसा खाण, चुना फॅक्टरी, सिमेंट फॅक्टरी असून या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात (ओव्हरलोड) वाहतूक सुरू आहे. असे शेकडो ट्रक या मार्गावरून जात असतात. त्यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे.
गेल्या एक महिन्यांपासून मुकुटबन येथे कोळसा खाण सुरू झाल्यापासून या परिसरात मोठ्या प्रमाणात कोळशाची वाहतूक वाढली आहे. मुकुटबन ते वणी नवीन झालेल्या मार्गावरील हिवरधरा गावापासून कायर पर्यंत अनेक खड्डे पडून रस्ता खराब झाला आहे. तर ट्रकमधील कोळशावर नेट झाकून नसल्याने रस्त्यावर अनेक ठिकाणी कोळसा पडलेला आहे. यामुळे दुचाकी स्वारांच्या अपघाताची भीती वाढली आहे. ओव्हरलोड वाहतुकीबाबत रुईकोट व भेंडाला येथील गावकऱ्यांनी पोलीस स्टेशनला केली होती. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही.
काही वर्षांपूर्वी ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या अपघातात एका व्यापाराचा मृत्यू झाला होता. तेव्हा संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तेव्हापासूनच जड वाहतूक रात्री 8 वाजतापासून करण्याचा निर्णय झाला होता. मात्र आता दिवसरात्र कोळसा वाहतूक सुरू आहे.
ओव्हरलोड वाहतूक पोलीस स्टेशनच्या जवळून जात असताना पोलीस विभाग मात्र याकडे डोळेझाक करीत आहे. आरटीओ विभागणी जिती टन एक ट्रक मध्ये वाहतूक करण्याचे पास केले आहे. याची सुद्धा पाहणी केली जात नसून फक्त अर्थपूर्ण समंधमुळे ही वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे ही ओव्हरलोड वाहतूक बंद कऱण्याची मागणी होत आहे.
हे देखील वाचा: