रामचंद्र खिरेकार ठरले जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट नायब तहसीलदार

यवतमाळ येथे महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते सन्मान

0

जितेंद्र कोठारी, वणी: वणी तहसील कार्यालयात कार्यरत नायब तहसीलदार रामचंद्र बी.खिरेकार संपूर्ण जिल्ह्यात उत्कृष्ट नायब तहसीलदार ठरले आहे. 1 ऑगस्ट महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन खिरेकार यांचा गौरव केला. आदिवासी बहुल झरी तालुका महसूल विभागात कार्यरत असताना त्यांनी केलेली उत्तम कामगिरी व कर्तव्यदक्षतेमुळे जिल्ह्यातील 16 तालुक्यातील नायब तहसीलदारांपैकी रामचंद्र खिरेकार यांची निवड करण्यात आली. कर्तव्यदक्ष आणि महसूल कायद्यांचा सूक्ष्म अभ्यास असलेले अधिकारी म्हणून नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकार यांना ओळखले जाते.

राज्यात महसुली वर्षाला 1 ऑगस्ट पासून सुरवात होत असल्याने हा दिवस महसूल दिन म्हणून राज्यात साजरा करण्यात येतो. महसूल विभाग अंतर्गत उत्कृष्ठ कामगिरी करणारे उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी ते कोतवाल याना सन्मानित करण्यात येते. रामचंद्र खिरेकार याना उत्कृष्ठ नायब तहसीलदार सन्मान मिळाल्यामुळे सर्व स्तरावरून त्यांचे स्वागत होत आहे.

हा वणी महसूल विभागाचा सन्मान: विवेक पांडे
वणी महसूल विभागात कार्यरत रामचंद्र खिरेकार याना उत्कृष्ठ नायब तहसीलदारचे सन्मान मिळणे हा संपूर्ण वणी महसूल विभागाचा सन्मान आहे. झरी विभागात काम करीत असताना त्यांनी ज्या पद्धतीने आपले कर्तव्य बजावले त्यामुळे ते या सन्मानाचे हकदार आहे. नायब तहसीलदार खिरेकार यांच्या सहकार्याने आम्ही आणखी चांगली सेवा नागरिकांना देऊ. वणी महसूल विभागाच्या वतीने नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकार यांचे अभिनंदन करतो.
:विवेक पांडे, तहसीलदार, वणी

हे देखील वाचा:

वणीतील सनराईज स्कूलची प्रवेश प्रक्रिया सुरू

वणी बसस्थानकावर 2 प्रवाशांना मारहाण करून लुटले

 

Leave A Reply

Your email address will not be published.