खर्रा शौकिनांचे होणार वांदे, पानटपरी बंदीचा आदेश

आदेशाचे उल्लंघन केल्यास होणार कायदेशीर कार्यवाही

0

बहुगुणी डेस्क, वणी: कोरोना व्हायरसवर विविध खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शासनाने पानटपरी, पानठेला बंदीचा आदेश दिला आहे.  हा आदेश पुढील आदेश येत पर्यंत लागू राहणार आहे. खर्रा बंदीच्या आदेशाने मात्र खर्रा शौकिनांचे चांगलेच वांदे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शासनाने कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार पानटपरी, पानठेले बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.

वणीत मोठ्या प्रमाणात खऱर्याचे शौकिन आहेत. खर्यातून रोज लाखोंची उलाधाल होते. हजारो नागरिकांचे कुटुंब पानटपरीच्या व्यवसायावर जगतात. यात मोठ्या प्रमाणात गरीब व्यावसायिकांचा समावेश आहे. खर्रा बंदीचा आदेश आल्याचे केवळ खर्रा शौकिनांवरच नाही तर या व्यावसायिकांवरही त्याचा परिणाम होणार आहे.

गुरूवारपासून बार आणि वाईन शॉप बंद 

आधी संध्याकाळी आठ पर्यंतचा बार आणि वाईनशॉपला परवानगी देण्यात आली होती. मात्र नवीन आदेशानुसार आता बारही पुढील आदेशापर्यंत बंद राहणार.

Leave A Reply

Your email address will not be published.