(क्लिक करून अपडेटेड न्यूज वाचा: धक्कादायक… अखेर वणीत कोरोनाचा शिरकाव….)
जब्बार चीनी, वणी: सध्या वणी कोरोनापासून दूर असला तरी अध्येमध्ये संशयीतांमुळे खळबळ उडत असते. मात्र यावेळी एका संशयीतांमुळे वणीमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यात केंद्र सरकारच्या आरोग्य सेतू ऍपमध्ये 1 पॉजिटिव्ह व एक जोखीम असा उल्लेख आल्याने वणीकरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (अपडेट – सध्या दोन पॉजिटिव्ह असे ऍपमध्ये दाखवत आहेत.)
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 11 जून रोजी मुंबईहून एक कुटुंब वणीत आले. शुक्रवारी त्या कुटुंबातील दोन व्यक्ती काही कामानिमित्त नागपूर येथे गेले. ते कोणत्या कामासाठी गेले याची निश्चित माहिती नसली तरी तेव्हापासून वणीत उलटसुलट चर्चेला उधाण आले. संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास त्या घरासमोर अचानक प्रशासनाच्या गाड्या उभ्या आल्याची माहिती शहरात पसरली. प्रशासकीय अधिकारी तिथे पोहोचल्याची माहिती मिळतातच लोकांनीही तिथे गर्दी केली. परिणामी चर्चेने आणखीनच जोर धरला.
(क्लिक करून अपडेटेड न्यूज वाचा: धक्कादायक… अखेर वणीत कोरोनाचा शिरकाव….)
आरोग्य सेतू ऍपने वाढवली चिंता…
केंद्र सरकारने कोरोनापासून बचाव करण्यासाठी व खबरदारी बाळगण्यासाठी आरोग्य सेतू हे ऍप काढले आहे. तसेच हे ऍप प्रत्येकाने इन्टॉल करण्याची विनंतीही केली आहे. या ऍपमध्ये परिसरातील कोरोना पॉजिटिव्ह पेशन्ट बाबत माहिती दिली जाते. या ऍपमध्ये वणी परिसरात गेल्या 28 दिवसात एक पॉजिटिव्ह रुग्ण व एक जोखीम असा मॅसेज आल्याने चर्चेला आणखीनच उधाण आले.
वणी अद्याप कोरोनापासून दूरच
वणीत जरी कोविडबाबत विविध चर्चेला उधाण आले असले तरीही जिल्ह्यातील कोविड रुग्णाबाबतची माहिती जाहीर करण्याचा अधिकार केवळ जिल्हाधिकारी यांना आहे. प्रशासनातर्फे अद्याप वणीत पॉजिटिव्ह रुग्ण आढळल्याची कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. त्यात संशयीत नागपूरला गेल्याने त्याबाबत नागपूरचे कलेक्टर अधिकृतरित्या माहिती जाहीर करणार. मात्र शासनाच्या आरोग्य सेतू ऍपमध्ये वणीत पॉजिटिव्ह रुग्ण दाखवत असल्याने परिसरात खळबळ मात्र उडाली आहे.
अपडेट – आरोग्य सेतून ऍपमध्ये आता दोन पॉजिटिव्ह असा आकडा दाखवत आहेत.
(क्लिक करून अपडेटेड न्यूज वाचा: धक्कादायक… अखेर वणीत कोरोनाचा शिरकाव….)