परशुराम पोटे यांची सलग तिसऱ्यांदा तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड

पुरुषोत्तम नवघरे, वणी : तालुक्यातील मानकी गावात तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी परशुराम सदाशिव पोटे यांची सलग तिसऱ्यांदा अविरोध निवड करण्यात आली आहे. 18 ऑगस्ट रोजी सरपंच कैलास पिपराडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ग्रामसभेत त्यांची सर्वानुमते तंटामुक्त समिती अध्यक्ष पदावर निवड झाली. परशुराम पोटे हे 2016 पासून मानकी ग्राम तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आहेत.

गावातील इच्छुक प्रत्येकांना तंटामुक्त समितीच्या माध्यमातून कार्य करण्याची संधी मिळावी म्हणून त्यांनी आपल्या पदाचा नुकताच राजीनामा दिला होता. मात्र त्यांचे स्थानिक वाद-तंटे निपटारा करण्याचे कार्य उल्लेखनीय असून मनमिळाऊ स्वभाव व निर्णयातील सचोटी यामुळे त्यांची तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून फेरनिवड करण्यात आली. परशुराम पोटे हे दैनिक हिंदुस्थान वृत्तपत्राचे वणी तालुका प्रतिनिधी तसेच स्टिंग ऑपरेशन न्यूज पोर्टलचे मुख्य संपादक आहेत. 

मानकी ग्राम तंटामुक्त समितीमध्ये पदसिद्ध सदस्य म्हणून सरपंच कैलास पिपराडे, उपसरपंच शंकर माहुरे, सदस्य नानाजी पारखी, उमेश सावरकर, विठ्ठल सरवर, शंकर वासेकर, गुरुदेव चिडे, तर सचिव म्हणून पोलिस पाटील सौ मिनाक्षी मिलमिले यांची सदस्य पदी निवड करण्यात आली. यावेळी गावातील पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कृषी अधिकारी, ग्रामसेविका कविता कातकडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments are closed.