सामाजिक संघटनने राजकीय भूमिका घेणे उचित आहे का ?

या प्रश्नावर पारोमिता गोस्वामी झाल्या निरुत्तर

0

निकेश जिलठे, वणी: ज्या सामाजिक संघटनेने संपूर्ण चंद्रपूर जिल्हा दारूमुक्त करण्यासाठी जिवाचे रान केले आणि या जिल्ह्यात दारूबंदी करण्यास शासनाला भाग पाडले. अशा श्रमिक एल्गार संघटनेने चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत एका राजकीय पक्षाच्या हितासाठी विशिष्ट राजकीय भूमिका घेणे उचित आहे का? असा प्रश्न विचारला असता या संघटनेच्या सर्वेसर्वा पारोमिता गोस्वामी या निरुत्तर झाल्या. आज दिनांक 8 एप्रिल रोजी दुपारी दिड वाजता गंगशेट्टीवार मंगल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या संवाद साधत होत्या. यावेळी स्वामिनीचे महेश पवार व दोन्ही संघटनांचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पत्रकारांशी वार्तालाप करताना गोस्वामी म्हणाल्या की यवतमाळ जिल्हा संपूर्णपणे दारूमुक्त करण्यासाठी निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात येईल व त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे खासदार हंसराज अहिर यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की आघाडी सरकारने यवतमाळ जिल्हा व चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यासाठी कोणतेही पाऊल न उचलता उलट आंदोलकांनावर कारवाई करत गजाआड केले.

विद्यमान भाजप सरकारने या साडेचार वर्षांत यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी का केली नाही या प्रश्नाच्या उत्तरालाही पारोमिता गोस्वामी यांनी थातुरमातुर उत्तर देऊन बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

धानोरकर नाही, पण अहिरच का?
पत्रकारांशी वार्तालाप करण्याच्या आधी पारोमिता गोस्वामी यांनी महिला मेळाव्यात महिलांशी संवाद साधला. यावेळी महिलांना आवाहन करताना त्या म्हणाल्या की धानोरकर हे दारूबंदीच्या विरोधात असल्याने आपण महिलांनी भाजपचे उमेदवार हंसराज अहिर यांना मतदान केले पाहिजे. हाच धागा पकडून पत्रकारांनी त्यांना धानोरकर नाही, मग अहिरच का ? आणि या दोघांशिवाय निवडणुकीच्या रिंगणात इतरही अकरा उमेदवार रिंगणात आहेत. अशा वेळी आपण केवळ अहिरांनाच मतदान करण्याचे जाहीर आवाहन उपस्थित महिलांना का केले ? असे विचारताच याही प्रश्नाला त्या निरुत्तर झाल्यात.

…आणि महेश पवारांनी मध्येच थांबवली पत्रकार परिषद
पत्रकार परिषदेत पत्रकारांनी पारोमिता गोस्वामी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. उर्वरित अकरा उमेदवार रिंगणात आहे, पण अहिरच का याचे केविलवाणे उत्तर देण्याचा प्रयत्न पारोमिता गोस्वामी करत असताना स्वामिनीचे महेश पवार यांनी चिडून पत्रकार परिषद थांबवत असल्याचे जाहीर केले.

Leave A Reply

Your email address will not be published.