त्यानंतर वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व शिवसेना नेते किशोर तिवारी यांच्या उपस्थितीत पारसमल आबड, इंदरचंद आबड, कमलचंद आबड, महेंद्र आबड यांच्या हस्ते जैन पताकाचे ध्वजारोहण करण्यात आले. मान्यवरांचे सत्कार कार्यक्रमानंतर मुनिश्री अमृतऋषी जी म.सा.यांनी उपस्थित प्रमुख अतिथी व श्रावक श्राविका यांना मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी स्वावलंबन मिशनचे माजी अध्यक्ष किशोर तिवारी व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मुनिश्री याना वंदन करुन आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमात यवतमाळ, वणी, कुंभा, राळेगाव, घाटंजी, आर्णी येथील जैन संघाच्या पदाधिकारी व मुकुटबन, अडेगाव, वणी येथील वरिष्ठ जैन श्रावकांची उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर गौतम प्रसादी (स्नेह भोजन) चा लाभ निमंत्रित अतिथी, आगंतुक व स्थानिक जैन बंधू भगिनी यांनी घेतला.
जितेंद्र कोठारी, मुकुटबन : जैन धर्माचे 23 वे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांचा जन्म कल्याणक महोत्सव मुकुटबन येथे रविवार 18 नोव्हेंबर रोजी उत्साहाने साजरा करण्यात आला. राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंदऋषी जी म.सा. यांचे सुशिष्य श्रमण संघीय उप प्रवर्तक अक्षयऋषी जी म.सा.,अमृतऋषी जी म.सा. व नवदीक्षित गीतार्थऋषी जी म.सा. यांचे सानिध्यात मुकूटबन येथील महावीर भवनमध्ये या निमित्त जैन ध्वजारोहण व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ मुकुटबन व भारतीय जैन संघटना यवतमाळ यांच्यातर्फे पार्श्वनाथ जन्म कल्याणक महोत्सवचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 8 वाजता महावीर भवन येथून शोभायात्रा काढण्यात आली. मुलींच्या लेझिम पथकासह निघालेल्या शोभायात्रेमध्ये मुकूटबन, अडेगाव, वणी, मोहदा, मार्की, शिंदोला, कुंभा, पांढरकवडा, यवतमाळ, नागपूर येथील शेकडो जैन महिला पुरुष सहभागी झाले होते. रैलीमध्ये जैन धर्म की जय जयकार, महावीर का क्या संदेश, जिओ ओर जीने दो व इतर घोषणेने मुकूटबन नगरी दुमदुमली होती. शहरातील विविध मार्गातून मार्गक्रमण करीत शोभायात्रा 9.30 वाजता परत महावीर भवन येथे पोहचली.
पार्श्वनाथ जन्म कल्याणक महोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जैन सेवा समिती यवतमाळचे अध्यक्ष रमेशचंद खिंवसरा होते. उपाध्यक्ष पदावर अमरचंद गुगलीया, संदीप मुनोत, निर्मल छाजेड तर उद्घाटक म्हणून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व शिवसेना प्रवक्ता किशोर तिवारी होते. यवतमाळ येथील विजय बुंदेला या कार्यक्रमाचे संयोजक होते. मुनिश्री यांचे मुकूटबन येथे आगमन, मुक्काम व पार्श्वनाथ जन्म कल्याणक महोत्सवासाठी श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ मुकुटबनचे अध्यक्ष विजयकुमार कोठारी, उपाध्यक्ष महेंद्र आबड, सचिव सुरेंद्र तातेड, कोषाध्यक्ष नरेंद्र कोठारी, राजेश तातेड, विमल बोहरा, अनिल कोठारी, किशोर कोठारी, दिनेश पिपाडा, मनीष सुराणा, प्रीतम लोढा, आनंद कोठारी, आशिष तातेड, सुरेंद्र तातेड, विनोद कोठारी, जितेंद्र तातेड, आनंद आबड, हेमंत कोठारी, प्रशांत कोठारी, अनिल कोठारी (पांढरकवडा ल.), हिमांशू तातेड, राज तातेड, प्रथम आबड व महिला मंडळ यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र गेलडा व विमल बोहरा यांनी केले. आभार अध्यक्ष विजय कोठारी यांनी मानले.
भगवान पार्श्वनाथ यांच्याबद्दल थोडक्यात ..!
भगवान पार्श्वनाथ जैन धर्माचे 23 वे तीर्थंकर मानले जातात. त्यांच्या जन्म अरिष्टनेमिच्या एक हजार वर्षांनी इश्वाकू वंशात पौष महिन्याच्या कृष्ण पक्ष एकादशीला झाला होता. भगवान पार्श्वनाथ वयाच्या तीसव्या वर्षीच गृहत्याग करून संन्यासी झाले. पौष महिन्याच्या कृष्ण एकादशीला त्यांनी दीक्षा घेतली. 83 दिवस कठोर तपस्या केल्यानंतर 84 व्या दिवशी त्यांना चैत्र कृष्ण चतुर्थीच्या दिवशी सम्मेद पर्वतावर ‘घातकी’ झाडाच्या खाली कैवल्य ज्ञानाची प्राप्ती झाली. श्रावण शुक्ल सप्तमीला पारसनाथ पर्वतावर त्यांचे देहावसान झाले. या पर्वताला सम्मेद शिखर म्हंटले जाते. हे तीर्थक्षेत्र भारताच्या झारखंड प्रदेशातील गिरिडीह जिल्ह्यात मधुबन येथे आहे
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.