पाटण येथे खासदार, आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

प्रथम बक्षीस १ लाख तर दुसरे ५० हजार रुपये

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण येथे समस्त ग्रामवासियांतर्फे खासदार, आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हा चषक २६ जानेवारी पासून सुरू होत आहे. ही स्पर्धा शहरी विभाग व ग्रामीण विभाग अशा दोन विभागात आहे. हे सामने टेनिस बॉलने खेळविले जाणार आहे.

शहरी विभागाकरिता प्रथम बक्षीस केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या तर्फे १ लाख रुपये, दुसरे बक्षीस ५० हजार तर तिसरे बक्षीस २५ हजार जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षी बोलेनवार व संगीता मानकर यांच्या तर्फे ठेवण्यात आले आहे.

ग्रामीण विभागाकरिता प्रथम बक्षिस १५ हजार स्व मल्लारेड्डी येणगुवार यांच्या स्मूती प्रित्यर्थ जगदीश येणगुवार यांच्या तर्फे असून दुसरे बक्षीस १० हजार रुपये पोच्चीराम पोर्जलवार स्मूती प्रित्यर्थ कन्हैया गांधी यांच्या तर्फे तर तिसरे बक्षीस ५ हजार कु मीनाक्षी संदीप टोनपेवार यांच्या तर्फे आहे. प्रत्येक सामन्यात ३००१ पासून १००१ रुपयांपर्यंत वैयक्तिक बक्षिसे ठेवण्यात आली आहे.

प्रातिनिधिक फोटो

सामन्यांचे युट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपण
या संपूर्ण सामन्यांचे युटु्यूबवर लाईव्ह प्रसारण होणार आहे. तसेच खेळले गेलेले प्रत्येक सामने युट्यूबवर पब्लिश केले जाणार आहेत. ज्यामुळे प्रत्येक खेळाळू व क्रीडाप्रेमी रसिकांना घरबसल्या सामने बघता येणार आहेत. क्रिकेट सामन्याचे उदघाटन २६ जानेवारीला केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर व आमदार संजयरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार तर प्रमुख अतिथी तहसीलदार अश्विनी जाधव, सरपंच रमेश हललवार, जि. प सदस्य मीनाक्षी बोलेनवार, संगिता मानकर, राम आईटवार.

राजू येल्टीवार, अशोकरेड्डी बोदकुरवार, प्रकाश कासावार, पं. स सभापती लता आत्राम, पं.स सदस्य प्रणीता घुगुल, राजेश्वर गोंद्रवार, पं. स उपसभापती नागोराव उरवते, ठाणेदार अमोल बारापात्रे, राजेश अडपावार, विजय उईके, प्रवीण नोमुलवार, महेश बाडलावर, संदीप बुरेवार, सतीश दासरवर, राजरेड्डी म्याकलवार, शेख हसन, संतोष माहुरे, सतीश आदेवार, सतीश नाखले, जगदीशरेड्डी येणगुवार, अशोकरेड्डी बोदकुरवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सदर क्रिकेट सामन्यात सहभाग घेण्याचे आवाहन अध्यक्ष शे अमजद, उपाध्यक्ष आकाश पुप्पलवार, सचिव राकेश आईटवार, सहसचिव महेश कतूरवार, कोषाध्यक्ष राजू द्यावर्तीवार, गौरव मीटपल्लीवार, मुकेश जयस्वाल, अनिल पोर्जलवार, प्रकाश बेरेवार, दिनेश कोटवार, श्रावण नोमुलवार यांच्यासह समस्त ग्रामस्थांनी यांनी केले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.