घरफोडी करणा-या 3 आरोपींच्या आवळल्या मुसक्या

डोर्ली येथे 2 ठिकाणी घरफोडी, आरोपीला पोलीस कोठडी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील डोर्ली येथील महादेव प्रकाश भोयर व मधूकर भोयर यांच्या घरी दिनांक 17 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास चोरी झाली होती. एका घरफोडीत चोरट्यांनी दागिने व रोख रक्कम असा सुमारे 13 हजार हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. तर दुस-या चोरीत सुमारे 17 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. या प्रकरणाचा छडा लावत पाटण पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. शंकर केशव मडावी (30), छगन पुंजाराम मडावी (35) व दिलीप तुळशीराम कुडमेथे (40) सर्व रा. पिंपरी पांढरकवडा असे आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 2500 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

डोर्ली येथील महादेव प्रकाश भोयर यांच्या घरी दिनांक 17 ऑगस्ट रोजी पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप व कोंडा तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी दोन जुन्या लोखंडी पेटीचे टाळे तोडून सोन्या चांदीचे दागिने व नगदी 1500 रुपये असा एकूण 13 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.

तर दुस-या घटनेत त्याच दिवशी चोरट्यांनी मधुकर भोयर (52) रा. डोर्ली यांचे घराचे दरवाजे तोडुन घरातील मधल्या कपाटाचा दरवाजा कापुन कपाटातील 13 हजार नगदी व दागिणे असा एकूण 17 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. याबाबत पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला होता.

पाटण ठाणेदार संगिता हेलोंडे यांनी तपासाची चक्र फिरवली. खबरींच्या गोपनिय माहिती वरून आरोपी शंकर केशव मडावी (30), छगन पुंजाराम मडावी (35) व दिलीप तुळशीराम कुडमेथे (40) सर्व रा. पिंपरी पांढरकवडा यांना अटक केली. आधी उडवाउडवीची उत्तरे देण्या-या आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा कबुल केला.

आरोपींकडून 1500 रुपये व दोन चांदीची चाळ किंमत 1050 रुपये असा एकुन 2550 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी कडून इतरही मुद्देमाल जप्त करायचे असल्याने न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक संगिता हेलोंडे, श्यामसुंदर रायके, संदीप सोयाम, अमित पोयाम, सचिन गाडगे, प्रशांत तलांडे व दिग्रस येथील पोलीस पाटील नंदु कुंटलवार यांनी केली.

हे देखील वाचा:

मारहाण प्रकरणी बापलेकास दंडाची शिक्षा

वणी शहतात दुपारी विजेच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस

Comments are closed.