सुशील ओझा, झरी : देशात तंबाखू व तंबाखूजन्य वस्तुंमुळे लाखो लोकांना आपले जीव गमवावे लागले आहे. तंबाखूमुळे कर्करोग (कॅन्सर) सारखे जीवघेणे रोग होत असूनसुद्धा तरुण युवकांपासून तर वयोवृद्धांपयंर्त लोक तंबाखू, खर्रा, सिगारेट व बिडीच्या रूपात तंबाखूचे सेवन मोठ्या प्रमाणात होत आहे. ज्यामुळे जनतेला याचे परिणाम भोगावे लागत आहे.
त्या अनुषंगाने पाटण पोलीस स्टेशनमध्ये गांधी जयंतीचे औचित्य साधून तंबाखूमुक्तची शपथ घेण्यात आली. तसेच विधानसभा निवडणूक संदर्भात पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांना माहिती देण्यात आली. यावेळी ठाणेदार अमोल बारापत्रे, पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे, होमगार्डचे पथकप्रमुख मो. इरफान मो. युसूफ व कर्मचारी उपस्थित होते..