बेवारस दारू व 1 लाखांची रोख रक्कम जप्त

वणी पोलिसांची कार्यवाही,

0
विवेक तोटेवार, वणी: शनिवारी दिनांक आज 5 ऑक्टोबर रोजी सायं.5 ते 6 वाजताच्या दरम्यान वरोरा नाका येथे पोलिसांनी बस मधून चंद्रपूर येथे जात असलेली दारू 18970 रुपयाची दारू जप्त केल्याचे वृत्त आहे.
 निवडणूक आचार संहिता सुरू असल्याने वरोरा रोडवर वाहनांची कडक तपासणी सुरू आहे. शनिवारी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी  महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेस ची तपासणी केली. यामध्ये बस  क्र.MH 40 Y 5792 (दिग्रस-चंद्रपुर) आणि बस क्रं.MH 40 Y 5222(यवतमाळ-चंद्रपुर) या दोन्ही बसच्या लगेज मध्ये  देशी दारु 90 मि.ली क्षमतेचे एकुन २४० पव्वे 7440/- किमंतीचे आणि  बस क्र.MH 20 BL 2694 (परभणी-राजुरा) मधिल दोन बेवारस पिशवीतून  विदेशी दारुचा एकुन 96 बाटल्या 11,520 किंमतीच्या जप्त करण्यात आल्या.असा वरिल सर्व 18960/-रु. चा दारुचा बेवारस मुद्देमाल दारुबंदी असलेल्या चंद्रपुर जिल्हात जात असल्याचा तर्क लावल्या जात आहे. सदर सर्व माल जप्त करण्यात आला आहे.
तसेच शनिवारी दुपारी 5 वाजताच्या सुमारास वरोरा नाक्यावर टाटा मिनी ट्रक वाहन क्रमांक  MH32 AJ 2239  ला रोखण्यात आले. गाडीचा चालक  मनोज रामाजी हिवसे वय 28 वर्ष रा.निपाणी ता.जि.वर्धा याचे कडुन 1,15,000/- रोख रक्कम जप्त करण्यात आली. याबाबत विचारणा केली असता मनोज याने उडवाउडवीची उत्तरे दिली. शिवाय सदर रक्कम कोणत्याही कागदपत्राशिवाय बाळगल्याने निवडनुकीत गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी जप्त करुन उपकोषागार कार्यालय वणी येथे ठेवण्यात आली आहे. याबाबतची माहिती आयकर विभागाला देवुन पुढिल कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार वैभव जाधव यांच्याकडून देण्यात आली आहे.
  सदर कार्यवाही पोलिस निरिक्षक वैभव जाधव, नायब तहसिलदार वैभव पवार, पोऊनी गोपाल जाधव, डी बी पथक वणी, जयंत झाडे (मंडळ अधीकारी), नितीन बांगडे (मंडळ अधीकारी), उल्हास निमेकर (मंडळ अधीकारी), पो. हे अनंत इरपाते, अनिल मेश्राम, सैफ हनिफ, अक्षय कोंडावार, फोटोग्राफर विशाल निवलकर यांनी केली.
Leave A Reply

Your email address will not be published.