पाटण पोलीस स्टेशनमधील हाडपक गणपतीचे विसर्जन

दुर्गा व शारदादेवी मंडळांना विसर्जनातून दिले एकतेचे संदेश

0

सुशील ओझा, झरी: मस्कऱ्या किंवा हाडपक्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाटण पोलिस स्टेशनच्या गणपतीचं विसर्जन थाटात झालं. अखेरच्या दिवशी पोलीस विभाग व ग्रामवासींयांच्या मदतीने महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आले. गाजावाजा करून विसर्जन करण्यात आले. विसर्जनादरम्यान पोलीस कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी यांनी भगवे ड्रेस परिधान केले होते. त्यासोबतच आदर्श विसर्जन कसे असावे याचे हे उत्कृष्ट उदाहरण होते . या विसर्जनातून एकतेचा संदेशही मिळाला. पुढील दुर्गोत्सव आणि शारदोत्सवात याचा उपयोग विविध मंडळांना होईल.

तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अनेक गावात गणपती, दुर्गा शारदादेवीची स्थापना होते . त्यात अनेक मंडळात गणपती किंवा देवी स्थापनेवेळी व विसर्जन करतेवेळी काही समाजकंटक व मद्यपी वाद घालून आनंदमय वातावरणात विरजण घालतात. अशांतता पसरविण्याचा प्रयत्न करतात. ज्यामुळे झगडे भांडण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवतो. गावासह मंडळाची बदनामी होते.

झगड्यात गुन्हेगारांसह निष्पाप लोकांनाही यांचे फळ भोगावे लागते. हा सर्व प्रकार घडू नये व आनंदी वातावरणात सर्वधर्म समभावाचे संदेश देण्याच्या उद्देशाने पाटण पोलीस स्टेशन चे ठाणेदार अमोल बारापात्रे व पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे यांनी पोलीस बॉईज गणेश मंडळाची स्थापना करून गणपतीची स्थापना पोलीस ठाण्याच्या आवारात केली.

मानाचा असलेला गणपतीची १० दिवस पूजा-अर्चना करून तसेच दहाही दिवस गावातील लहान मुलांना व त्यांच्या पाल्याना पाचारण करून सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमात संगीत खुर्ची, लिंबू चमचा, डोळ्याला पट्टी बांधून मडके फोडणे अशा विविध कार्यक्रमात गावातील सर्वच धर्मातील लोक उपस्थित होते.

पोलीस व ग्रामवासींयांच्या एकतेने शांततेत विसर्जन करण्यात आले. अशीच भूमिका सर्व गणेश ,दुर्गा व शारदा मंडळांनी करावे व एकता दाखवावी असे आवाहन ठाणेदार अमोल बारापात्रे व गणेश मोरे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.