वाघोबा आला रे आला, म्हणताहेत पवनारवाले

पट्टेदार वाघाचा मुक्तसंचाराने परिसरात दहशत

0

संजय लेडांगे, मुकुटबन: वनपरिक्षेत्रातील पवनार (बंदी) वनवर्तुळालगत असलेल्या शेतशिवारात पट्टेदार वाघाचा मुक्तसंचार वाढल्याचे गावकरी म्हणत आहेत. शेतीकाम करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांना अधून-मधून पट्टेदार वाघाचे दर्शन होत आहेत. परिणामी ते पट्टेदार वाघाच्या दहशतीत वावरत आपल्या शेतातील शेती कामे जीव मुठीत घेऊन करीत आहेत.दरम्यान परिसरात भीतीचे वातावरण आहेत. त्यामुळे ‘वाघाेबा आला रे आला’ असं म्हणण्याची वेळ गावकऱ्यांवर कधीही येऊ शकते.

पवनार(बंदी), कोसारा, डोंगरावर, बोबापूर आणि आडकोली गावपरिसरात मागील काही दिवसांपासून पट्टेदार वाघाचा मुक्तसंचार वाढला आहे. जंगलालगत असलेल्या या गावंंपरिसरातील शेतीकाम करणाऱ्यांना पट्टेदार वाघाचे दर्शन होत आहेत. यातून शेतकरीवर्ग व शेतमजूर भयभीत होऊन चांगलेच धास्तावले आहेत. या परीस्थितीत शेतकरी व शेतमजूर कसे-बसे शेतीकाम करीत आहेत.

परिसरात शेतीकाम करणाऱ्यांना या परिसरात मुक्त संचार करणाऱ्या पट्टेदार वाघाच्या पंजाच्या ठश्यांचे निशाण दृष्टीस पडत आहेत.  मुक्तसंचार करणाऱ्या पट्टेदार वाघ, जंगलात चराईसाठी गेलेल्या जनावरांवर हल्ला चढवून फस्त करण्याच्या घटनेत दररोज भर पडत आहेत. यात  गुराखीही पट्टेदार वाघाच्या दहशदीत आहेत. शेतकरी लवकरच घरी परतत आहेत.

परिसरात पट्टेदार वाघाचे अस्तित्व कायम असल्याने शेतमजूरही  शेती कामासाठी धजावत नसल्याचे बोलले जात आहेत. वनवर्तुळालगतच्या शेत शिवारात पट्टेदार वाघाची दहशत कायम असल्याचे सांगण्यात येत आहेत.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.