आर्यन कन्स्ट्रक्शन कंपनी विरोधात ग्राहकांचा आंदोलनाचा इशारा
विख्यात योगेश पंजाबी प्रकरण विरोधात ग्राहकांचा एल्गार
विवेक तोटेवार, वणी: योगेश पंजाबी यांचे आर्यन कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी असून ते सदनिका बांधून विकण्याचा व्यवसाय करतात. त्यांचा गणेशपूर येथे सर्वे क्रमांक 87/4 सदनिका क्रमांक 67 ते 72 क्षेत्रफळ 1176.62 चौरस मीटर असून त्यांचा सदर सदनिका विकण्यासबधी करार झाला होता. या सदनिकेची जवळपास 80ते 90 % रक्कम ग्राहकांनी दिली ही होती. परंतु बिल्डर योगेश पंजाबी यांनी सदनिकेचे बांधकाम करून दिले नाही. दीड वर्षांपासून बांधकाम बंद आहे.
ग्राहकांनी सदनिका घेण्यासाठी कर्ज घेतले आहे. आता कर्जाचा हफ्ता भरणे व किरायच्या घरात राहणे हा नाहकच आर्थिक व मानसिक त्रास ग्राहकांना सहन करावा लागतो आहे. बांधकाम पूर्ण नसल्याने सदनिकेमध्ये राहणेही शक्य नाही. अशा वेळी न्याय मिळवण्यासाठी ग्राहकांना आपला वेळ व पैसाही खर्च करावा लागत आहे.
त्यातच एक नवीन माहितीही ग्राहकांना मिळाली की, सदनिका दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचाही आरोप ग्राहकांनी केला आहे. याबाबत फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ग्राहकांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु न्याय मात्र मिळाला नाही. आता संबंधित ग्राहकांनी त्रस्त होऊन उपोषण करण्याचं इशारा दिला आहे. या संदर्भात ठाणेदार मुकुंद कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी अपार व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना निवेदन देण्यात आले आहे.
सदर कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक योगेश पंजाबी यांच्यावर या अगोदरही वणी पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद आहे. ग्राहकांना फसविणे हे आता नित्याचेच होउन बसल्याचे दिसून येत आहे. यावर आता प्रशासनाने मदत करावी व सदर कंपनीच्या मालकावर कार्यवाही करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ग्राहकांनी निवेदनाच्या माध्यमातुन केली आहे. आता बिल्डर आणि त्याला फसवणूक करण्यात मदत करणाऱ्यांवर प्रशासन काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.