वणी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे नामनिर्देश पत्राची छाणनी पूर्ण

अनेकांनी नाव घेतले मागे, चिखलगाव ग्रामपंचायतीकडे सर्वांचं लक्ष

0

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील 19 ग्रामपंचायतीची निवडणूक 7 ऑक्टोबर रोजी होणार आहे. बुधवारी नामनिर्देश मागे घेण्याची अंतिम तारीख होती. यात 13 उमेदवारांनी त्यांचे नाव मागे घेतले आहे. सरपंच पदाकरिता 11 सदस्यांनी आपले नाव मागे घेतले. तर 11 उमेदवारांचे अर्ज याआधीच त्रुटी असल्याने बाद झाले आहे.

ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीत 353 उमेदवार आपले भविष्य अजमावणार आहेत. तर सरपंच पदासाठी 72 उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत. 7 ऑक्टोबरला निवडणूक होणार असून 9 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

चिखलगाव ग्रामपंचायतीकडे सर्वांचं लक्ष
तालुक्याचे मॉडेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलगाव ग्रामपंचायत ही १३ सदस्य संख्येवरून १७ सदस्य संख्येवर पोहचली आहे. मागील गेल्या १५ वर्षांपासून एकहाती सत्ता प्रस्थापित करून चिखलगाव ग्राम पंचायत विकासाच्या दृष्टीने मॉडेल म्हणून ओळख देणारे सरपंच सुनील कातकडे यावेळी सुद्धा सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्नात आहे. त्यांच्यासमोर भाजपचे संजय पिंपळशेंडे यांचं आव्हान असणार असून भाजप देखील पूर्ण शक्ती पणाला लावून उमेदवार रिंगणात उतरवत आहे.

कसे आहे सरपंच पदाचे आरक्षण ?

सर्वसाधारण – शिंदोला, वरझडी, कायर
सर्वसाधारण महिला – कुरई, अहेरी, ब्राम्हणी
ना.मा.प्र.(महिला) – चारगाव, रांगणा, केसुर्ली, पुरड (नेरड)
ना.मा.प्र. (ओ.बी.सी.) – मेंढोली, वारगाव, साखरा (दरा), गणेशपूर, मंदर, कळमना (बु.)
अनुसूचित जाती – बोर्डा, वेळाबाई
अनुसूचित जमाती – चिखलगाव

Leave A Reply

Your email address will not be published.