जादूटोणाच्या संशयावरून युवकाला मारहाण

भास्कर राऊत मारेगाव : मुलावर जादूटोणा केल्याच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना मारेगाव तालुक्यातील सूर्ला गावात घडली. सदर प्रकरणी आरोपीवर मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, मौजा सुर्ला येथील फिर्यादी मंगेश उरकुडा कोडापे (27) गुरुवार 3 ऑगस्ट रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास प्रात:विधी आटोपून आपल्या घराकडे परत येत होता. यावेळी गावातीलच शंभु कनाके यांनी रस्त्यात अडवून तू माझ्या मुलाला जादूटोना केला म्हणून माझा मुलगा बिमार आहे. असे म्हणून मंगेश कोडापे सोबत वाद घालून कुऱ्हाडीने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मंगेशने कुऱ्हाडीचा वार अडवल्याने त्याच्या हाताला जखम झाली. 

त्याठिकाणी उपस्थित गावातील काही नागरिकांनी दोघांमधील वाद सोडवला. परंतु आरोपी शंभू कनाके यांनी मंगेशला शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून फिर्यादी मंगेश कोडापे यांनी मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. मारेगाव पोलिसांनी आरोपीवर कलम 334,504,506 भादवी अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.