चपलेने केला घात, घट विसर्जन करताना इसम गेला वाहून

घोन्सा येथील विदर्भा नदीपात्रातील घटना

विवेक तोटेवार, वणी: घोन्सा येथील एक इसम विदर्भा नदी पात्रातील पुराच्या पाण्यात वाहून गेला. ही घटना 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान घडली. राजू श्रीहरी बोरकुटे (50) असे वाहून जाणा-या इसमाचे नाव आहे. देवीचा घट विसर्जित करण्यासाठी राजू नदीवर गेला होता.  नदी पात्रात राजूचा शोध सुरू आहे.

राजू श्रीहरी बोरकुटे (50) हा बाहेरगावातील रहिवाशी असून घोन्सा येथील एका शेतक-याकडे तो सालगड्याचे काम करतो. गेल्या 10 वर्षांपासून तो गावातच त्याची पत्नी व मुलीसह राहतो. घोन्सा परिसरात शुक्रवारी रात्रीपासून पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी नाल्याला पुराचे स्वरूप आले आहे. विदर्भा नदी देखील पावसामुळे दुथडी भरून वाहत आहे.

आजपासून दुर्गा विसर्जनाला सुरूवात झाली आहे. आज दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास राजू काही व्यक्तींसह देवीचा घट विसर्जित करण्यासाठी गावालगत असलेल्या विदर्भा नदीच्या पात्रात गेला होता. घट विसर्जन करताना राजूच्या पायातील चप्पल नदीच्या पाण्यात वाहून गेली. चप्पल पकडण्यासाठी राजू नदी पात्रात गेला. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने राजू प्रवाहात वाहून गेला.

राजू वाहून जाताच घटनास्थळावरील लोकांनी याची माहिती प्रशासनाला दिली. गावातील काही व्यक्ती नदी पात्रात शोध घेत आहे. दरम्यान घटनास्थळी नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, मुकुटबन पोलीस अधिकारी यांनी भेट दिल्याची माहिती आहे. राजूचा शोध अद्यापही सुरू आहे.

हे देखील वाचा:

थोडक्यात महत्त्वाच्या क्राईम अपडेट

तहसील कार्यालयासमोरील दुकानाला लागली भीषण आग

मातोश्री ट्रेडर्सची 3 वर्षांची यशस्वी घोडदौड पूर्ण

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.