(शेतात वीज कोसळून दोन महिला ठार)
रवि ढुमणे, वणी: वणी तीलुक्यातील झरपट येथील दोन मुलांनी पलंगाखाली ठेवलेले किटकनाशक खाल्याने त्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. हा प्रकार लक्षात येताच त्यांना वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
झरपट येथील विलास कालेकर या शेतकऱ्याने शेतातील पिकावर फवारणी करण्यासाठी बाजारातून कीटकनाशके खरेदी केले होते. कीटकनाशके घरातील पलंगाखाली व्यवस्थित ठेवले होते. सकाळी विलासचा आठ वर्षांचा नवनीत व साडेपाच वर्षांचा लहान नैतिक हे दोघेही खेळत होते. दरम्यान पलंगाखाली त्यांनी एका खरड्याची पेटी दिसली. उत्सुकतेपोटी ती पेटी मुलांनी उघडली त्यात प्लॅस्टिकचे चमचा दिसल्याने पेटीतील पॅकिंग असलेला कागदी डबा सुद्धा उघडला.
त्यात पावडर दिसल्याने दोघांनाही खाण्याचा मोह आवरता आला नाही. नवनीत आणि नैतिक या दोघांनी एक एक चमचा भरला आणि मुखात टाकला. तोच त्यांना वेगळीच चव लागल्याने दोघेही खोकलत बाहेर पडले. हा प्रकार विलासच्या लक्षात आला. त्याने विलंब न करता दोघांनाही वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
नवनीत व नैतिक विलास कालेकर या दोनही चिमुकल्याना विषबाधा झाल्याचे दिसून आल्याने डॉक्टरांनी उपचार सुरू केले. मात्र नेमके औषधातील घटक कोणते आहे ही तपासणी झाल्यावरच पुढील उपचार करता येईल असे डॉक्टरांनी सांगितले होते. सध्या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ सुनीलकुमार जुमनाके यांनी सांगितले आहे. दोघांनाही चोवीस तास रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात येणार आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Next Post