जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्य वणीत फोटोग्राफी स्पर्धा संपन्न

रविवारी होणार बक्षिस वितरणाचा कार्यक्रम

0

वणी: जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त 19 ऑगस्ट शनिवारी वणीत फोटोग्राफी स्पर्धा झाली. ही स्पर्धा ब्लॅक डायमंड सिटी फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने घेण्यात आली होती. स्थानिक जैताई मंदिरात झालेल्या स्पर्धेच्या फोटो प्रदर्शनीला वणीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.

Podar School 2025

या स्पर्धेत प्रथम पारितोषिक मातोश्री फोटो स्टुडियो वणी, द्वितीय पारितोषिक संजय कालर, वणी तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक वैष्णवी फ़ोटो स्टुडियो मारेगाव यांना जाहिर झाले. या कार्यक्रमात परिसरातील 15 फोटोग्राफरने सहभाग घेतला होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्रथम पुरस्कार प्राप्त फोटो

(पोळा स्पेशल: शेतकरी आणि विद्यार्थ्यांवर पोळ्यातही संकट)

विजेत्यांना रविवारी दिनांक 20 ऑगस्टला दुपारी 12 वाजता बक्षिस वितरण करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर आणि आमदार संजीवरेड्डी बोतकुरवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षिस वितरणाचा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं असं आवाहान आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे.

द्वितीय पुरस्कार प्राप्त फोटो
Leave A Reply

Your email address will not be published.