वणीत जागतिक फोटोग्राफी दिन साजरा

वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला दिन

0

विवेक तोटेवार, वणी: आज बुधवारी दि. 19 ऑगस्ट रोजी वणीतीतल फोटोग्राफर एकता मंचतर्फे जागतिक फोटोग्राफी दिवस साजरा करण्यात आला. वृक्षारोपण व ट्रीगार्ड लावून हा दिवस साजरा करण्यात आला. शहरातील मोक्षधाम, विठ्ठल-रुखमाई मंदिर परिसर, दिनानाथ नगर, ग्रामपंचायत लालगुडा, अहिल्याबाई होळकर सभागृह येथे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच झाडांना ट्रीगार्ड लावण्यात आले. दरवर्षी वणीतील फोटोग्राफरतर्फे विविध स्पर्धा आणि प्रदर्शनी सारखे उपक्रम राबवून हा दिन साजरा केला जातो. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण करून फोटोग्राफी दिन साजरा करण्यात आला.

यावेळी सुभाष इंगोले, प्रवीण मैद, अनिल दुमनवार, नरेंद्र खोब्रागडे, राजेंद्र चांदोरे, जयप्रकाश वर्मा, संघपाल खैरे, राजुभाऊ ठाकरे, संजय कालर, प्रमोद काकडे, जयंत खनगण, प्रवीण भगत, राजू झाडे, प्रमोद पाणघाटे, महादेव मडावी, महेश पुंड, आशीष डंभारे, अतुल खोब्रागडे, सुमित लांजेवार, इरफान अली, प्रसाद बिलोरिया, समीर गोवारदीपे, सुनील कोंगरे, आवेश शेख, विनोद दरेकर, कुंदन पेंदोर, निखील मडावी. इत्यादी फोटोग्राफर उपस्थित होते.

फोटोग्राफी दिन का साजरा केला जातो?
1837 साली फ्रेंच तंत्रज्ञ Louis Daguerre आणि Joseph Nicephore Niepce यांनी Daguerreotype फोटोग्राफी प्रोसेस चा शोध लावला व त्याचे पेटंट घेतले. ही प्रोसेस म्हणजे फोटो आयन ने तांब्याच्या प्लेटवर ज्याला चांदीचा मुलामा दिला आहे छायाचित्र ठसविले गेले. हे पहिले प्रिंटेड छायाचित्र मानले जाते जे दीर्घकाळर्यंत टिकते. फ्रेंच सरकारला ते पेटंट उपयोगी वाटले म्हणून त्यांनी ते विकत घेतले, व काही दिवसातच 19 ऑगस्ट 1939 साली ते सामान्य जनतेसाठी खुले केले. पेटंट खुले केले गेल्यापासून फोटोग्राफी क्षेत्राची झपाट्याने प्रगती झाली. तेंव्हा पासून हा दिवस जागतिक फोटोग्राफी दिवस म्हणून साजरा केला जातो.

वणीतही गेल्या काही वर्षांपासून शहरातील फोटोग्राफर संघटना तसेच फोटोग्राफर विविध उपक्रम राबवून हा दिवस उत्साहात साजरा करतात.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.