वणीतील मयूर मार्केटिंग (सोनी शोरुम) येथे ‘बाप्पा मोरया’ फेस्टिव्हल ऑफर

टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन इत्यादींवर भव्य सुट, प्रत्येक खरेदीवर आकर्षक गिफ्ट

0

विवेक तोटेवार, वणी: शहरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या मयूर मार्केटिंग (सोनी शोरुम) येथे गणेश चतुर्थी निमित्त ग्राहकांसाठी खास ‘बाप्पा मोरया’ फेस्टिव्हल ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. या ऑफरला ग्राहकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. या फेस्टिव्हल ऑफरमध्ये ग्राहकांना एलईडी टीव्हीवर 25 हजारांपर्यंत सूट, फ्रिजवर 15 हजारांपर्यंतची सूट तर वॉशिंग मशिनवर 10 हजारांपर्यंतची सूट दिली जाणार आहे. याशिवाय एसी व ब्रॅन्डेड वस्तूंवर घसघशीत सुट दिली जाणार आहे. सोबतच प्रत्येक वस्तूंवर एक सरप्राईज गिफ्ट मिळणार आहे. ही ऑफर केवळ 21 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट पर्यंत असणार आहे.

वणीत माहेर कापड केंद्राच्या बाजूला मार्केट रोड येथील मयूर मार्केटिंग (सोनी शोरूम) या नावाने प्रसिद्ध असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या शोरुममध्ये गणेश चतुर्थी निमित्त बाप्पा मोरया फेस्टिव्हल ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. यात जपानची सुप्रसिद्ध कंपनी सोनीच्या टीव्हीवर 30 टक्यांपर्यंतची सुट मिळणार आहे. हायर कंपनीची 32 इंची स्मार्ट शेअर एलईडी टिव्ही दोन वर्षांच्या वॉरन्टीसह केवळ 11,990 रुपयांमध्ये ग्राहकांना मिळणार आहे. तर सॅमसंगचा 1.5 टन एसी केवळ 28,990 रुपयांमध्ये व कोणतीही वॉशिंग मशिन 7490 रुपयांपासून मिळणार आहे. फ्रिज 8990 रुपयांपासून ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

प्रत्येक वस्तूंवर एक आकर्षक सरप्राईज गिफ्ट
प्रत्येक वस्तूंवर एक आकर्षक गिफ्ट दिले जाणार आहे. तर काही ब्रॅन्डवर होम थिएटर, ब्लुटूथ स्पिकर, सोनी कंपनीचा पॉव्हर बँक, सोनी कंपनीचा हेडफोन गिफ्ट दिला जाणार आहे. यासह सोनी कंपनाच्या टीव्हीच्या काही सिलेक्टेड मॉडेलवर टीव्हीवर ऍमेझॉनची फायर स्टिकही गिफ्ट मिळणार आहे. तसेच सोनीची 32 इंचाची 19990 रुपये किंमत असलेली टीव्ही 16990 रुपयांमध्ये मिळणार आहे. यात 3 हजारांची ग्राहकांची बचत होणार आहे. तसेच ही टिव्ही केवळ 1 रुपयाच्या डाऊनपेयमेन्टवर* ग्राहकांना मिळणार आहे. याशिवाय खरेदी केलेल्या या वस्तूंसाठी बजाज फायनान्सची 0 टक्के व्याजदरावर सुविधा देखील मिळणार आहे.

सोनी कंपनीच्या वस्तूंव्यतिरिक्त शोरूममध्ये सॅमसंग, एलजी, पॅनॉसॉनिक, आयएफबी, बॉस्च, व्हर्लपूल, हायर इत्यादी प्रसिद्ध कंपनीचे प्रॉडक्ट देखील उपलब्ध आहेत. सोबतच बजाज कंपनीचा मिक्सर देखील उपलब्ध आहे.

 

इतर टीव्हींचे ऑफरमधले दर…
24 इंची एलईडी टीव्ही – 5090 रुपये, 32 इंची एलईडी टिव्ही – 7990 रुपये, 32 इंची ऍन्ड्रॉईड एलईडी टीव्ही – 8490 रुपये, 40 इंची ऍन्ड्रॉईड एलईडी टीव्ही – 12990 रुपये, 43 इंची ऍन्ड्रॉईड एलईडी टीव्ही – 16990 रुपये तर 50 इंची ऍन्ड्रॉईड एलईडी टीव्ही – 23990 रुपये.

ऑफरचा लवकरात लवकर फायदा घ्यावा….
 -गणपती हे महाराष्ट्राचे लाडके दैवत आहे. सणवारासारख्या शुभ प्रसंगी ग्राहक मोठ्या प्रमाणात वस्तूंची खरेदी करतात. त्यामुळे ग्राहकांना अधिकाधिक फायदा होण्यासाठी आम्ही आमच्या शोरुममध्ये गणेश चतुर्थी निमित्त बाप्पा मोरया फेस्टिव्हल ऑफर लॉन्च केली आहे. ही ऑफर केवळ एका आठवड्यासाठी असल्याने ग्राहकांनी त्याचा लाभ घेऊन घसघशीत बचत करावी.
– बतरा बंधू, संचालक मयूर मार्केटिंग (सोनी शोरुम)

आधी मयूर रेडियोज नावाने असणारे मयूर मार्केटिंक हे प्रतिष्ठाण परिसरात एक सुपरिचित नाव आहे. 1980 पासून हे प्रतिष्ठाण इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीच्या व्यवसायात असून आपली सेवा आणि विश्वास यासाठी ओळखले जाते. गणेश उत्सवानिमित्त ग्राहकांसाठी मयूर मार्केटिंगमध्ये (सोनी शोरुम) फेस्टिव्हल ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. या ऑफरचा अधिकाधिक लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी मयूर मार्केटिंग (सोनी शोरूम) माहेर कापड केंद्राच्या बाजूला, मार्केट रोड वणी येथे भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क: मुकेश बतरा-  9822228730  पुनित बतरा- 9511793963

* अटी व शर्ती लागू

Leave A Reply

Your email address will not be published.