आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत वृक्षारोपण
नांदेपेरा रोड व एपीएमसी मार्केटमध्ये करण्यात आले वृक्षारोपण
जब्बार चीनी, वणी: राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वणीमध्ये युवासेनेतर्फे शहरातील नांदेपेरा रोड व कृषि उत्पन्न बाजार समिती येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वणी विधानसभा क्षेत्राचे संपर्क प्रमुख सुनिल कातकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोनामुळे आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना कोणातीही बजेजावपणा न करता वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आदेशानुसार युवासेनेने कोणतेही होर्डिंग न लावला पर्यावरण पूरक वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले. त्यानुसार युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या तर्फे नांदेपेरा रोड व एपीएमसी मार्केट येथे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी प्रमोद मिलमिले, सतीश बडघरे, नगर सेवा समिचे नामदेव शेलवडे, राजेंद्र साखरकर, महेश लिपटे यांच्यासह शिवसैनिक हेमंत गौरकार, सौरभ वानखेडे, ध्रुव येरणे, योगेश आवारी, शिवराम चिडे, किशोर ठाकरे, अमृत फुलजले, नरेश ठाकरे, नैनिश हनुमंते, मंगेश डांगे, प्रणय मिलमिले, अभय सुरशे यांच्यासह युवासैनिक उपस्थित होते.
हे देखील वाचा: