सुनील बोर्डे, वणी: तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा चिलई येथे काव्योत्सवाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने ख्यातनाम कवी व निवेदक सुनील इंदुवामन ठाकरे यांचा ‘‘जगू कविता: बघू कविता’’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला जवळपास 10 ते 12 जि. प. शाळांमधील शिक्षक, विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर धगडी, उपाध्यक्ष गजानन दरेकार, पदाधिकारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये कवितेची गोडी वाढविण्यासाठी सुनील इंदुवामन ठाकरे हे दोन तपांहून अधिक काळापासून विद्यार्थ्यांशी ‘‘जगू कविता: बघू कविता’’ या कार्यक्रमातून संवाद साधत आहेत. चिलई येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी नारायण सुर्वे, ग्रेस, सुरेश भट, साने गुरूजी अशा अनेक कवींच्या कवितांमधून विद्यार्थ्यांना जगण्यातली सकारात्मकता दिली. कवितांमधील अनेक सकारात्मक पैलूंवर प्रकाश टाकणारे त्यांचे सादरीकरण हे कार्यक्रमाचे विशेष ठरले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील वाटेकर यांनी तर आभार प्रदर्शन व नियोजन संजय नागभिडकर व महादेव खंडाळे यांनी केले.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Next Post