विवेक तोटेवार, वणी: अवैधरित्या दारू विक्रीसाठी नेत असलेल्या दोन इसमांवर वणी पोलिसांनी 27 डिसेंबर रोजी कारवाई केली. यातील एक कारवाई ब्राह्मणी रोड तर दुसरी कारवाई तलाव रोड येथे करण्यात आली. या दोन्ही कारवाईत 140 देशी दारुचे पव्व्यांसह 1 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
वणी पोलिसांना वणीतून देशी दारुची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी तलाव रोड येथे सापळा रचला. संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास पथकाला एक इसम दुचाकीवर पिशवीत काहितीरी घेऊन येताना दिसला. त्याची पिशवी तपासली असता त्यात 70 देशी दारुचे पव्वे आढळून आले. त्याला दारु बाळगण्याचा परवाना मागितला असता त्याच्याकडे तो नव्हता.
पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव अमित सुरेश घोडाम (22) रा. बोपापूर ता. झरी असे सांगितले. पोलिसांनी 70 पव्वे किंमत 2450 रुपये व दुचाकी (MH29 AC9414) असा एकूण 82 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ब्राह्मणी रोडवर कारवाई
गोपनीय माहितीच्या आधारावर दुसऱ्या कारवाई ही ब्राह्मणी रोडवर करण्यात आली. संध्याकाळच्या सुमारास या ठिकाणी पोलीस पथकाने सापळा रचला. रात्री 7.30 वाजताच्या सुमारास पोलिसांना एक इसम एक इसम दुचाकीवर येत असल्याचे दिसले. त्याच्याकडील पिशवी तपासली असता या पिशवी देशी दारुचे 70 पव्वे आढळून आले.
सदर इसमाची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव नितीन राजाराम येलगलवार (50) रा अमरावती असून हल्ली तो वणी येथे मुक्कामी असल्याचे सांगितले. त्याच्याकडून 2450 रुपये किमतीची दारू व दुचाकी असा एकूण 17450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोघांवरही महाराष्ट्र दारूबंदी कायदा 65 (अ) (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.