संचारबंदीत हेअर सलून सुरू ठेवल्याने गुन्हा दाखल

शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई

0

विवेक तोटेवार, वणी: सध्या राज्यभर संचारबंदी लागू आहे. प्रशासनाने संचारबंदी आधीच अनिश्चित काळासाठी हेअर सलून बंद करण्याचे आदेश दिले आहे. मात्र बंदच्या आदेशाकडे डोळेझाक करून हेअर सलून सुरू केल्यामुळे एका हेअर सलून चालकावर कारवाई करण्यात आली आहे.

वणीतील पंचशील चौकात ज्ञानेश्वर हेमाजी नागतुरे राहणार वाघदरा यांचे हेअर सलून आहे. संचारबंदी दरम्यान त्यांचे दुकान सुरू असल्याने गस्त घालणा-या पथकाला दिसले. त्यावरून त्यांनी कारवाई केली. दुकान चालकावर 188 अंतर्गत लोकसेवकाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले.

लोकांनी घराबाहेर निघू नये तसेच संचारबंदीचे पालनन करा असे आदेश देण्यात आले आहे. तसेच केवळ अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यापारी प्रतिष्ठान बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. मात्र त्यातही काही दुकानदार छुप्या रितीने आपले व्यापारी प्रतिष्ठान सुरू ठेवत आहे. प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन प्रशासनातर्फे देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.