गांजा तस्कर गजाआड

14 किलो गांजा जप्त

0
विवेक तोटेवार, वणी: शहरात रेल्वे स्टेशन परिसरात गांजाची खेप येत असल्याची गोपनीय माहिती यवतमाळ व वणी गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्या आधारे पोलिस पथकाने धाड टाकुन गांजा तस्कराच्या मुसक्या आवळल्या आहे. तस्कराकडून १४ किलो गांजा जप्त केला असून, कारचालक तेथून पसार झाला.
विक्की कैलास धुळे (२१) रा. लोहारा यवतमाळ असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर शैलेश राठोड रा. सिद्धेश्वरनगर यवतमाळ असे फरार आरोपीचे नाव आहे. वणी येथील पट्टाचार्यनगरमध्ये गांजा तस्करामार्फत गांजाची खेर येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे प्रभारी ठाणेदार दिलीप वडगावकर, साहाय्यक पोलीस निरीक्षक विजयमाला रिठे व डीबी पथक यांनी सापळा रचून शनिवारी सायंकाळी ६ वाजता पट्टाचार्यनगरमध्ये छापा टाकला.
यावेळी पांढऱ्या रंगाच्या स्वीप्ट कार क्र. एमएच २९ एआर ३२०५ मधून विक्की धुळे हा बॅग घेऊन उतरला. त्या पोलिसांनी पकडताच कारचालक शैलेश राठोड रा. यवतमाळ हा कार घेऊन फरार झाला. बॅगची झडती घेतली असता प्लास्टिक पॅकेटमध्ये वेगवेगळे एक ते दीड किलोचे पॅकेट असा एकूण १४ किलो ५४० ग्रॅम गांजा किंमत १ लाख ५४ हजार रुपयांचा गांजा आढळला. आरोपी विक्की धुळे यास वणी पोलिसांनी अटक करून भादंवि ८सी, २० (सी), २२ अंतर्गत गुन्हा नोंद केला..
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर, पोलीस उपनिरीक्षक विजयमाला रिठे, अशोक काकडे, पोलीस अधीक्षक विशेष पथकाचे साहाय्यक फौजदार अजय ढोले, वासुदेव साठवणे, रूपेश पाली, योगेश डगवार, डीबी पथकाचे सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, प्रदीप नाईकवाडे, अमित पोयाम, दीपक वांड्रसवार यांनी केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.