शिवणी (धोबे) येथील पोलिसाचा मृत्यू, गडचिरोली येथे होते कार्यरत

शोकाकुल वातावरणात करण्यात आले अंत्यसंस्कार

भास्कर राऊत, मारेगाव: महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या शिवणी (धोबे) येथील रहिवासी असलेल्या पोलीसाचा चंद्रपूर येथील खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शंकर देवराव धोबे ,वय 35 वर्षे असे पोलीसाचे नाव असून ते महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलामध्ये 28 जुलै 2014 ला सेवेमध्ये रुजू झाले होते. सध्या ते राज्य राखीव दलाच्या बल क्रमांक 13 मध्ये विसोरा, ता. वडसा, जि. गडचिरोली येथे कार्यरत होते.

शंकर यांना मागील काही दिवसांपासून पोटाचा त्रास होता. त्यावर त्यांचे उपचार सुरू होते. चंद्रपूर येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू असतांना अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. मृदू आणि हळव्या स्वभावाच्या शंकर यांच्या जाण्याने पोलीस विभागात तसेच शिवणी गावावर शोककळा पसरलेली आहे.

शंकर यांच्या अकाली जाण्याने त्यांची पत्नी आणि तीन वर्षांची चिमुकली मुलगी पोरकी झाली आहे. शंकर यांच्या मागे आईवडील, पत्नी , तीन वर्षाची मुलगी, एक भाऊ आणि दोन बहिणी तसेच बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांचेवर शिवणी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिक व पोलीस दलातील कर्मचारीही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हे देखील वाचा:

फाशी घेतलेल्या व विष पिलेल्या तरुणाला मिळाले जीवदान

प्रिन्स लॉनजवळ विचित्र अपघात, भरधाव अल्टो कारची दुचाकी, कार व अॅटोला धडक

Comments are closed.