गोवंश तस्करीचा डाव उधळला, 7 जनावरांची सुटका

वाहने सोडून आरोपी फरार, डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई

विवेक तोटेवार, वणी: वणीतून बाहेरगावी गोवंशाची तस्करी करणा-यांचा डाव डीबी पथकाने उधळून लावला. आज सकाळी 6 वाजताच्या सु्मारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत 7 गोवंशाची सुटका करण्यात आली. मात्र आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. या धाडीत सुमारे 3 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अज्ञात आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की डीबी प्रमुख माया चाटसे यांना खबरी द्वारा शहरातील खरबडा परिसर येथून एका मालवाहतूक गाडीतून गोवंशाची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकाला सोबत घेत सापळा रचला व जत्रा मैदान परिसरातील रोडवर नाकाबंदी केली. सकाळी 6 वाजताच्या दरम्यान खरबडा मोहल्ला येथून रंगनाथ नगर मार्गे मालवाहतूक टाटा ओसीई (MH 29 OT 0285) वाहन हे नाकाबंदी असलेल्या ठिकाणी आले.

चालकाला पथकाने गाडी थांबवण्याचा इशारा केला. मात्र चालक व त्यासोबतचा इसम गाडी तिथेच सोडून पळून गेला. या गाडीच्या मागेच रेकी करण्यासाठी एक अपाची दुचाकी (MH 29 BL 6314) होती. त्यांना ही थांबण्यास सांगितले असता त्या गाडीचा चालक व मागे बसलेली व्यक्ती दोघेही गाडी तिथेच ठेऊन पळून गेले.

मालवाहु गाडीची पाहणी केली असता वाहनाच्या डाल्यात 7 गोवंश जनावरे आढळून आलीत. हे जनावरे निदर्यतेने दोरांनी बांधून होते तसेच तसेच त्यांच्या चारापाण्याची कोणतीही व्यवस्था तिथे करण्यात आली नसल्याचे पथकाला आढळून आले. या प्रकरणी 7 गोवंशी ज्याची किंमत 42 हजार रुपये, मालवाहतूक वाहन किंमत 1 लाख 80 हजार रुपये व अपाचे दुचाकी ज्याची किंमत 75 हजार रुपये असा एकूण 2 लाख 97 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी अज्ञात आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याच्या कलम 5 (अ) (ब), 9, 9 (अ), प्राण्यांचा छळ अधिनियमाच्या कलम 11 (1) (ए) (बी)(ई) (एफ) (एच) (आय) (के) यासह मोवाकाच्या कलम 130 (3) व 177 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध सुरु आहे.

सदर कार्यवाही डॉ. दिलीप पाटील-भुजबळ पोलीस अधीक्षक यवतमाळ, खंडेराव धरणे अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, संजय पुज्जलवार उप. वि.पो.अ.वणी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार पो. नि. शाम सोनटक्के यांच्या आदेशावरून डी. बी पथक प्रमुख स.पो.नि. माया चाटसे यांच्या नेतृत्त्वात सुदर्शन वानोळे, अशोक टेकाळे, हरीन्द्रकुमार भारती, पंकज उंबरकर, विशाल गेडाम, शंकर चौधरी यांनी पार पाडली. पुढील तपास स.पो.नि. माया चाटसे या करीत आहे.

हे देखील वाचा:

क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणा-या दोघांना अटक

रेड लाईट एरियात पोलिसांची धाड, एका मुलीची सुटका

वारे नगरपालिकेचे भाग 6: 5 वर्षात झाले तब्बल 5 नगराध्यक्ष

Comments are closed.