देशमुखवाडी परिसरातील घरातून दारूसाठा जप्त

1 लाख 74 हजार रुपयांची देशी दारू जप्त

0

विवेक तोटेवार, वणी: शहरातील देशमुखवाडी परिसरात राहणाऱ्या एका बंद घरातून 1 लाख 74 हजार रुपयाची देशी दारू जप्त करण्यात आली आहे. सदर कारवाई डी बी स्कॉड व उपविभागीय पोलीस अधिकारी स्कॉड यांनी केल्याची माहिती आहे.

बुधवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारावर आरोपी राहुल दिलिप ठाकुरवार (35) राहणार देशमुखवाडी यांच्या राहते घरी पोलिसांनी धाड टाकली. त्याच्या दुमजली घरात खालच्या खोलीत खिडकीतून डोकावून पाहले असता खोलीत देशी दारूचे खोके दिसून आले. खोलीचे दार उघडून बघितले असता त्या ठिकाणी 70 देशी दारूचे बॉक्स मिळाले. पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत सदर माल जप्त केला. सध्या आरोपी राहुल ठाकूरवार फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कलम 66 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नाईक व ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गोपाल जाधव करीत आहे. बुधवारी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करीत पोलिसांनी दारू जप्त केल्याची माहिती आहे. याव्यतिरिक्त अजून तीन जणांवर दारू विक्रीप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या घटनेच्या अगोदर राहुल ठाकुरवार याच्यावर नागपूर येथील राज्य उत्पादन शुल्क यांनी कारवाई करीत घरातून मोठया प्रमाणात दारूसाठ जप्त करण्यात आला होता. त्याच्यावर कारवाई करीत गुन्हे दाखल केले होते. परंतु या कारवाईनंतरही राहुल हा विना परवाना दारूविक्री करीतच होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.