ईडीच्या कारवाईविरोधात राष्ट्रवादीचे निवेदन

पवारांविरोधात सूडबुद्धीतून कारवाईचा आरोप

0

बहुगुणी डेस्क, वणी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे एसएससीबी (महाराष्ट्र स्टेस कॉर्पोरेशन बँक) प्रकरणात जाणीवपूर्वक नाव टाकण्यात आले असून ईडीने त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवली आहे. हे केवळ सूडबुद्धीतून करण्यात आले आहे, असा आरोप करत बुधवारी 26 सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसने एसडीओंना निवेदन देऊन याचा निषेध केला आहे.

शरद पवार यांचा या बँकेच्या संचालक मंडळाशी कुठलाही संबंध नसताना सरकारने ईडीच्या खांद्यावर बंदूक ठेवून ही कार्यवाही केली आहे. शरद पवारांनी सरकारविरोधात प्रभावीपणे आघाडी उघडली आहे. लोकांचा त्याला भरभरून प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे सरकारच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या कारणाने सरकार ईडीच्या आडून असा सूडबुद्धीचा डाव खेळत आहे. असा आरोप करत या प्रकरणाची नि:पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या मार्गदर्शनात व राष्ट्रवादीचे वणी विधानसभा अध्यक्ष जयसिंग गोहोकर यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. यावेळी राजाभाऊ बिलोरिया, स्वप्नील धुर्वे, महेश पिदुरकर, प्रफुल्ल भगत, सोनू निमसटकर, विजयाताई आगबत्तलवार, आशाताई टोंगे, सविता ठेपाले, प्रतिमा वंजारी, प्रज्ञा वंजारी, सय्यद रविश यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.