एस.बी. लॉनजवळ क्रिकेट सट्टा अड्डयावर पोलिसांची धाड

लॅपटॉप, मोबाईल, दुचाकीसह 1 लाख 30 हजाराचा मुद्देमाल जप्त

जितेंद्र कोठारी, वणी : येथील एस.बी. लॉन जवळ एका घरात सुरु क्रिक्रेट सामन्यावर सट्टा खेळताना वणी पोलिसांनी धाड टाकली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. सुधीर रमेश चांदेकर (40) रा. शास्त्रीनगर वणी व सलीम जमील शेख (35) रा. भाग्यशाली नगर वणी असे अटक करण्यात आलेले आरोपीचे नाव आहे. धाड पडल्याची माहिती मिळताच सट्टा चालक व त्याचा दिवानजी फरार होण्यास यशस्वी झाले.

दि. 22 जुलै रोजी भारत विरुद्ध वेस्टइंडिजमध्ये त्रिनिदाद येथे सुरु एक दिवसीय क्रिकेट सामन्यावर क्रिकेट बॅटिंग सट्टा सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले याना मिळाली. माहितीवरुन सपोनि माया चाटसे हिने पोलीस स्टाफसह शुक्रवार 22 जुलै रोजी रात्री 11 वाजता एस.बी. लॉन जवळील दिलीप दुरुडकर याच्या घरावर धाड टाकली.

माहितीप्रमाणे घराच्या एका खोलीत दोन इसम मोबाईल ऍपवर ऑनलाईन क्रिकेट बॅटिंग जुगार खेळवताना आढळून आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सट्टा चालक मिनाजसाठी विवेक मधुकर मोडक, रा.पटवारी कॉलोनी हा इसम पैशांचा व्यवहार करीत असल्याची माहिती दिली. पोलिसांनी दोघांना अटक करुन त्यांच्या ताब्यातून लॅपटॉप 1 नग, टॅब 1, मोबाईल 10 नग, दुचाकी व 5 हजार 300 रुपये रोख, असा एकूण 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अटक करण्यात आलेले व फरार आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4,5 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले, सहा. पोलीस निरीक्षक माया चाटसे, पो.का. सुहास मंदावार, विशाल गेडाम, पुरुषोत्तम डडमल, शंकर चौधरी यांनी केली.

Comments are closed.