संतापजनक – अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार

वणी पोलिसांनी केली नराधमास अटक

जितेंद्र कोठारी, वणी : एकटेपणाचा व गतिमंदत्वाचा फायदा घेत 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना तालुक्यातील एका गावात उघडकीस आली आहे. या प्रकरणी वणी पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे. सुरेश पोचीराम गडेवार (47) असा आरोपीचा नाव आहे.

Birthday

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या संदर्भात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवार 22 जुलै रोजी दुपारी पीडित मुलगी घरात एकटी होती. त्याचवेळी पोळा सणानिमित्त दाराला जिवती लावण्याच्या बहाण्याने एका नराधमाने घरात घुसून बालिकेचा तोंड दाबून अत्याचार केला व तिथून पळून गेला. सायंकाळी मुलीचे आईवडील घरी आल्यावर पीडित मुलीने रडत रडत हकीकत सांगितली.

अत्याचार पीडित मुलीच्या आईची तक्रार व पीडितेच्या शेजाऱ्यांनी जिवती लावणाऱ्या व्यक्तीबद्दल दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी नराधम आरोपी सुरेश पोचिराम गडेवार रा. दामले फैल वणी यास अटक केली आहे. आरोपी विरुद्ध कलम 376 व बाल लैंगिक शोषण अधिनियम ( पॉक्सो) अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.उप.नि. शिवाजी टिपूर्णे करीत आहे.

Comments are closed.